कसोटी क्रिकेटच्या 142 वर्षांच्या इतिहासात होणार हा बदल

कसोटी क्रिकेटच्या 142 वर्षांच्या इतिहासात होणार हा बदल

कसोटी चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये केला बदल

  • Share this:

दुबई, 19 मार्च : क्रिकेटच्या खेळात आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. कसोटी क्रिकेट ते आताचे टी20 क्रिकेट अनेक गोष्टी बदलल्या. आता कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एका बदलाची तयारी सुरू आहे. एकदिवसीय सामन्यात खेळाडूंच्या जर्सीवर ज्याप्रमाणे नाव आणि नंबर लिहलेला असतो त्याप्रमाणे आता कसोटीत घातल्या जाणाऱ्या पांढऱ्या जर्सीवरही नंबर आणि नाव लिहण्यात येणार आहे.

कसोटी चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर हा बदल केला जाणार आहे. आयसीसीने म्हटले की, खेळाडू आता कसोटीच्या जर्सीवरही आपले नाव आणि नंबर वापरू शकणार आहेत. जर्सीचा रंग मात्र पांढराच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटने नव्या बदलाची तयारी सुरू केल्याचे म्हटले आहे.

वाचा : आता 'या' नवख्या वेगवान गोलंदाजाने वेधलं जगाचं लक्ष

पहिली कसोटी 1877 मध्ये खेळण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत कसोटी सामन्यात खेळाडू पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळत आहेत. काही काळानंतर खेळाडूंच्या टोपीवर नंबर लिहण्यात येऊ लागला. हा नंबर त्या देशाचा कितवा कसोटी खेळणारा खेळाडू आहे हे दर्शवत होता.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर्सीवर नंबर वापरला जातो. भारतात मात्र रणजी ट्रॉफीत खेळाडूंच्या जर्सीवर कोणताही नंबर नसतो. भारतात फक्त एकदिवसीय आणि टी20 सामन्यात नंबर आणि नाव वापरले जाते.

वाचा : IPL 2019 : एकही विजेतेपद नसलेल्या आरसीबीचे हे विक्रम अबाधित

कसोटी खेळणारे आघाडीचे 9 संघ कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेणार आहेत. 2 वर्षांत मायदेशात 3 आणि परदेशात 3 मालिका प्रत्येक संघ खेळणार आहे. यात टॉपच्या दोन संघात अंतिम सामना होईल. हा सामना जुलै 2021 मध्ये होणार आहे.

VIDEO : धावती ट्रेन पकडताना युवकाचा पाय घसरला; काळजाचा ठोका चुकवणारा

First published: March 19, 2019, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading