Home /News /sport /

मोठी बातमी: स्टार टेनिस खेळाडू महिनाभरापासून गायब, WTA नं केल्या सर्व स्पर्धा रद्द

मोठी बातमी: स्टार टेनिस खेळाडू महिनाभरापासून गायब, WTA नं केल्या सर्व स्पर्धा रद्द

टेनिस विश्वात गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विषयावर महिला टेनिस असोसिएशननं (WTA) मोठा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर:  टेनिस विश्वात गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विषयावर महिला टेनिस असोसिएशननं (WTA) मोठा निर्णय घेतला आहे. या असोसिएशननं चीनमधील सर्व स्पर्धा रद्द करणार असल्याचं जाहीर केलं आहे. महिला दुहेरीतील माजी नंबर 1 खेळाडू पेंग शुआई (Peng Shuai) ही महिनाभरापासून गायब आहे. चीनच्या माजी उपपंतप्रधानांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर ती गायब झाली आहे. तिच्या सुरक्षेची खात्री होईपर्यंत चीनमध्ये कोणतीही स्पर्धा होणान नसल्याचं  असोसिएशननं स्पष्ट केलं आहे. WTA चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह सायमन यांनी याबाबतचे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. 'ज्या देशात पेंग शुआईला स्वतंत्रपणे बोलण्यास परवानगी नाही, तिथं खेळण्यासाठी  खेळाडूंना कसं सांगू शकतो? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. शुआईवर तिने केलेले आरोप मागे घेण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही सायमन यांनी केला आहे. काय आहे प्रकरण? चीनची सर्वात मोठी टेनिसपटू असलेल्या पेंग शुआईनं 2 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहून माजी उपपंतप्रधान आणि  कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य झांग गाओली (Zhang Gaoli) यांच्यावर लैंगिक संबंध बनवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर अर्ध्या तासांमध्येच तिची पोस्ट डिलीट करण्यात आली. त्याचबरोबर पेंग शुआई देखील गायब झाली आहे. संपूर्ण चीनमध्ये खळबळ माजवणारे हे Me Too च्या प्रकरणावर मत व्यक्त करण्यास चीनच्या मीडियाला परवानगी नाही. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील हा विषय सेन्सॉर करण्यात आला आहे. या प्रकरणात पेंग शुआई सुखरूप असल्यााची खात्री पटेपर्यंत चीनमध्ये एकही स्पर्धा होणार नाही असा इशारा WTA नं दिला होता. त्यावर चीनच्या सरकारी मीडियानं पेंग शुआईच्या ईमेलचे काही स्क्रीन शॉट्स WTA ला पाठवले होते. त्यामध्ये टेनिस स्टारनं आपण केलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या नावावर आहे सर्वात मोठ्या पराभवाचा रेकॉर्ड, वाचून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास WTA नं हे ईमेल बनावट असल्याचं सांगत चीनचे स्पष्टीकरण फेटाळले आहे. त्यानंतर या प्रकरणाला एक महिना झाल्यानंतर असोसिएशननं चीनमधील सर्व टेनीस स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  35 वर्षांची पेंग शुआई ही दुहेरी टेनिसमधील माजी नंबर 1 खेळाडू असून तिनं फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे. चीनची टेनिस विश्वातील ओळख असलेल्या या खेळाडूलाच महिनाभरापासून गायब करण्यात आले आहे. त्यामुळे कम्युनिस्ट चीनमधील व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: China, Tennis player

    पुढील बातम्या