Home /News /sport /

US Open 2021: जोकोविचचं इतिहास रचण्याचं स्वप्न अधुरं, फायनलमध्ये झाला धक्कादायक पराभव

US Open 2021: जोकोविचचं इतिहास रचण्याचं स्वप्न अधुरं, फायनलमध्ये झाला धक्कादायक पराभव

नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोनिचचं (Novak Djokovic) कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं. रविवारी रात्री झालेल्या अमेरिकन ओपनच्या (US Open 2021) फायनलमध्ये जोकोविच पराभूत झाला.

    न्यूयॉर्क, 13 सप्टेंबर : नंबर 1 टेनिसपटू नोवाक जोकोनिचचं (Novak Djokovic) कॅलेंडर ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न अखेर अधुरं राहिलं. रविवारी रात्री झालेल्या अमेरिकन ओपनच्या (US Open 2021) फायनलमध्ये जोकोविच पराभूत झाला. 52 वर्षांनी पुरुषांच्या टेनिस क्रिकेटमध्ये इतिहास घडवण्याच्या उद्देशानं जोकोविच मैदानात उतरला होता. मात्र रशियाचा डेनियल मेदवेदेवनं (Daniil Medvedev) त्याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोकोविचचा या मॅचमध्ये 4-6, 4-6, 4-6 असा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेवरनं 1969 साली एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा (Calendar Grand Slam) जिंकल्या होत्या. जोकोविचननं यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन या तीन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकत अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे 52 वर्षांनी नवा इतिहास घडेल अशी आशा जोकोविचच्या फॅन्सना होती. मात्र त्यांची निराशा झाली. जोकोविचकडं सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा रेकॉर्ड करण्याचीही संधी होती. सध्या तो रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्या बरोबरीनं पहिल्या क्रमांकावर आहे. या तिघांनीही प्रत्येकी 20 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविचला अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकत फेडरर आणि नदालला मागं टाकण्याची संधी होती, पण तसं झालं नाही. T20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा होणार कॅप्टन! विराट कोहली घेणार मोठा निर्णय मेदवेदेवकडून पराभूत झाल्यानं चौथ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याची जोकोविचची संधी हुकली. त्यानं आजवर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 9 वेळा, फ्रेंच ओपन 2 वेळा तर विम्बलडन स्पर्धा 6 वेळा जिंकली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sports

    पुढील बातम्या