टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी आली नन्ही परी

टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी आली नन्ही परी

वर्ल्ड नंबर वन अमेरिकेनं टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झालंय.

  • Share this:

02 सप्टेंबर : वर्ल्ड नंबर वन अमेरिकेनं टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झालंय. सेरेनाचे कोच पेट्रिक मुरातोग्लू यांनी ही गोड बातमी टि्वट करून दिलीये. पेट्रिक यांनी टि्वटमध्ये सेरेनाला शुभेच्छाही दिल्यात.

सेरेना विलियम्स आणि ओहानिया याने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात इटलीत एका हाॅटेलमध्ये छोट्याखानी कार्यक्रमात साखरपुडा केला होता. मात्र, अजूनही दोघांचं लग्न झालेलं नाही.

त्यानंतर सेरेनाने आपण प्रेन्सेंसी असल्याची बातमी स्नॅपचॅटवर शेअऱ केली होती.

सेरेना विलियम्सने जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावून 23 व्या ग्रँड स्लॅममध्ये आपलं नाव नोंदवलंय. तेव्हा सेरेना ही दोन महिन्यांची गर्भवती होती. सेरेना विलियम्सही जगात सर्वात जास्त मानधन कमावणारी अॅथलिट आहे. विशेष म्हणजे प्रेगेंट असताना सुद्धा सेरेनाने अनेक कार्यक्रमात हजेरी लावली होती. कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर जगभरातून तिचं अभिनंदन होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2017 05:42 PM IST

ताज्या बातम्या