फेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले

फेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले

राफेल नादाल तसेच नोवाक जोकोविच चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तरीही फेडररला पसंती दिली जात होती

  • Share this:

फिफा वर्ल्ड कपप्रमाणेच विम्बल्डनमध्येही आता अनपेक्षित निकाल समोर आला आहे. टेनिस स्टार फेडररचा उपांत्यपूर्व फेरीत फेडररचा धक्कादायक पराभव झाला. टेनिस विश्वातला अनभिषीक्त सम्राट अशी ओळख असलेल्या फेडररने आतापर्यंत आठ वेळा विम्बल्डन कप जिंकला आहे. यावर्षीचाही विम्बल्डन तो जिंकून इतिहास रचेल अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र त्यांचे हे स्वप्न आता स्वप्नच राहिले आहे. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने फेडररवर 6-2, 7-6 (7-5), 5- 7, 4-6, 11-13 अशा मात केली.

आतापर्यंत फेडरर आणि अँडरसन चारवेळा आमने- सामने आले होते. मात्र चारही वेळा फेडररने त्याचा पराभव केला होता. मात्र विम्बल्डनमध्ये अँडरसनने फेडररचा पराभव करुन इतिहास रचला. तिसऱ्या सेटमध्ये फेडररला विजयाची संधी मिळाली होती. पण मोक्याच्या क्षणी अँडरसनने त्याचा खेळ उंचावर विजयावर आपली मोहर उमटवली. तब्बल सव्वा चार तास चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन झाले. फेडररने विम्बल्डनमध्ये मागच्या ८५ गेममध्ये आपली सर्व्हीस राखून गेम जिंकले होते. त्यामुळे हा गेमही तो जिंकेल असेच वाटत होते. यंदा राफेल नादाल तसेच नोवाक जोकोविच चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तरीही फेडररला पसंती दिली जात होती.

हेही वाचाः

आज ठाण्यात रिक्षा चालकांचं धरणे आंदोलन, या आहेत मागण्या

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

पाकने केला पहिल्या शिख पोलीस अधिकाऱ्याचा अपमान, पगडी हिसकावली

First published: July 12, 2018, 9:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading