Home /News /sport /

#Rally4Relief : दिग्गज टेनिस स्टार्सनी एका रात्रीत जमवले 24 कोटी रुपये

#Rally4Relief : दिग्गज टेनिस स्टार्सनी एका रात्रीत जमवले 24 कोटी रुपये

ऑस्ट्रेलियातील आगीत होरपळलेल्या प्राण्यासाठी चॅरीटी फंड रेझर स्पर्धेत सर्व दिग्गज टेनिस खेळले. राफेल नडाल आणि रॉजर फेडरर या दोघांनी एकत्रित दोन लाख 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर देण्याची घोषणा केली.

    मेलबर्न, 16 जानेवारी : ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत 50 कोटींपेक्षा अधिक प्राण्यांचा होरपळून मृत्यू झाला. याशिवाय मोठी वित्त हानी झाली आहे. यासाठी आता जगभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. क्रिडा क्षेत्रातून अनेक दिग्गज खेळाडूंनी याआधी मदत केली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्नने त्याच्या बॅगी कॅपचा लिलाव करून ती रक्कम आगीचा फटका बसलेल्यांसाठी दिली आहे. क्रिकेटनंतर आता टेनिस जगतातील स्टार खेळाडूंनी चॅरीटीसाठी सामने खेळले. बुधवारी मेलबर्नमध्ये झालेल्या चॅरीटी फंड रेझर स्पर्धेत सर्व दिग्गज टेनिस खेळले. राफेल नडाल आणि रॉजर फेडरर या दोघांनी एकत्रित दोन लाख 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर देण्याची घोषणा केली. तसेच दोघेही एकत्र खेळले. मेलबर्नमध्ये झालेल्या या स्पर्धेत सेरेना आणि कॅरोलिना वोजनियाकी यांच्या संघात सामने झाले. सेरेनाच्या संघाकडून नाडाल आणि जोकोविच हे दुहेरी मध्ये खेळले आणि जिंकले. मिश्र दुहेरीत नडाल अग्निशामक दलाचा जवान डेबसोबत खेळण्यासाठी उतरला होता. त्याच्याविरुद्ध सिसिपास आणि कॅरोलिना वोजनियाकी होता. तिघांनीही डेबकडे सहज फटके मारून खेळाचा आनंद लुटला. स्पर्धेतील सर्व सामने संपरेपर्यंत चॅरीटीसाठी तब्बल 5 मिलियन डॉलर रक्कम जमा झाली होती. रुपयांच्या हिशोबात याचे एकूण 24 कोटी रुपये होतात. चाहत्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल दिग्गज टेनिस स्टार्सनी सर्वांचे आभार मानले. वाचा : विराट, रोहित आणि बुमराहची चांदी; तर धोनीला दररोज 2 लाखांचा फटका
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Australia, Tenis

    पुढील बातम्या