Home /News /sport /

कोरोना लस न घेण्यावर जोकोविच ठाम, मोठी किंमत मोजण्याची तयारी!

कोरोना लस न घेण्यावर जोकोविच ठाम, मोठी किंमत मोजण्याची तयारी!

टेनिस सुपरस्टार नोवाक जोकोविच (Novak Djokovic) सध्या टेनिस कोर्टाबाहेरच्या कारणामुळे चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेपूर्वी त्याला परत पाठवण्यात आले होते. या प्रकरणावर जोकोविचने पहिल्यांदाच मौन सोडले आहे.

    मुंबई, 16 फेब्रुवारी : टेनिस सुपरस्टार नोवाक जोकोविच (Novak Djokovic) सध्या टेनिस कोर्टाबाहेरच्या कारणामुळे चर्चेत आहे. कोरोना लस (Coroan Vaccine) न घेण्याच्या त्याच्या निर्णयानंतर टेनिस विश्व ढवळून निघालं आहे. ऑस्ट्रेलियन सरकारनं त्याचा व्हिसा रद्द करत परत पाठवले.9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा जोकोविचला यंदा ही स्पर्धा न खेळताच मेलबर्न सोडावे लागले. या सर्व प्रकरणानंतरही जोकोविच लस न घेण्याच्या  भूमिकेवर ठाम आहे, यासाठी मोठी किंमत मोजण्याची त्याची तयारी आहे. कोरोना लशीच्या मुद्यावर ऑस्ट्रेलियन नंतर फ्रेंच ओपन (French Open) आणि विम्बल्डन (Wimbledon) या स्पर्धा देखील सोडण्याची जोकोविचची तयारी आहे. ऑस्ट्रेलियातून परत पाठवल्यानंतर जोकोविचनं पहिल्यांदाच या विषयावरील मौन सोडले. त्यावेळी त्यानं ही भूमिका मांडली. आपण कोरोना लसीकरण मोहिमेच्या विरोधात नाही, पण त्या मोहिमेत माझा सहभाग नाही. असे जोकोविचने 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. 'सर्व लोकांना त्यांना योग्य वाटेल ती गोष्ट निवडण्याचा अधिकार आहे. तुमच्या शरीरात काय जाईल हे ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे. मला आजवर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मी लस न घेण्याचं ठरवले आहे. या निर्णयाचा परिणाम काय होईल याची मला कल्पना आहे. या सर्वांची किंमत कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी आहे.' असे जोकोविचने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. जोकोविचनं आजवर दोन वेळा फ्रेंच ओपन आणि सहा वेळा विम्बलडन स्पर्धा जिंकली आहे. क्रिकेटवर पुन्हा कोरोनाचा अटॅक, एकाच टीममधील 11 जण पॉझिटिव्ह जोकोविचनं यावेळी ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनांवर देखील नाराजी व्यक्त केली. 'मी लस घेतली नाही, एखादा नियम मोडला किंवा माझ्या व्हिसामध्ये काहीतरी चूक होती. त्यामुळे मला परत पाठवले नाही. मी ऑस्ट्रेलियात कोरोना लसीकरणाच्या विरोधी वातावरण तयार करत आहे, असे त्यांच्या मंत्र्यांना वाटले त्यामुळे त्यांनी माझा व्हिसा रद्द केला. मी त्या विषयावर पूर्णत: असहमत आहे,' असे जोकोविचने यावेळी सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccine, Tennis player

    पुढील बातम्या