तीन मुलांची आई, दोन वेळा निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज!

तीन मुलांची आई, दोन वेळा निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज!

वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेल्या किम क्लाइस्टर्सन पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे. सात वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याचं तिनं सांगितलं आहे.

  • Share this:

बेल्जियम, 13 सप्टेंबर : माजी वर्ल्ड नंबर वन टेनिस स्टार किम क्लाइस्टर्सनं गुरुवारी निवृत्तीनंतर पुन्हा एकदा WTA मध्ये पुनरागमन करणार असल्याचं जाहीर केलं. तिनं सोशल मीडियावरून व्हिडिओ शेअरक करत ही माहिती दिली आहे. 2020 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. मला काही सिद्ध करायचं नसून एक आव्हान म्हणून मी उतरणार आहे असंही किमने म्हटलं.

किमने शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटलं की, बऱ्याच दिवसांपासून तुमच्यासोबत ही आनंदाची गोष्ट शेअर करायची होती. तिनं व्हिडिओत म्हटलं आहे की, गेल्या सात वर्षांपासून पूर्णवेळ कुटुंबासाठी दिला. मुलांकडे लक्ष दिलं. त्यांच्यावर खूप प्रेम आहे पण टेनिसवरही प्रेम आहे. मी टेनिसला विसरू शकत नाही. मी विचार केला की, या दोन्ही गोष्टी एकत्र करता येतील. मी माझ्या तिन्ही मुलांसह टेनिस प्लेअर होऊ शकते. पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची वेळ आहे.

क्लाइस्टर्सनं पहिल्यांदा 2003 मध्ये वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं. त्यावर्षी फ्रेंच ओपन, यूएस ओपनमध्ये तिला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तिनं पहिलं ग्रँडस्लॅम 2005 मध्ये जिंकलं होतं. तर त्यानंतर 2007 मध्ये पहिल्या मुलाला जन्म देण्यापूर्वी किमनं निवृत्ती घेतली होती. पुन्हा दोन वर्षांनी कोर्टवर उतरली आणि यूएस ओपन जिंकली होती. 1980 नंतर आई झाल्यावर सिंगल्स ग्रँडस्लम जिंकणारी ती पहिली खेळाड़ू ठरली होती.

2010 मध्ये किमनं युएस ओपन जिंकली होती. या स्पर्धेत तिनं व्हिनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्सला पराभूत केलं होतं. तर 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनसुद्धा जिंकली होती. त्यानंतर मात्र, दुखापतीमुळं 2012 मध्ये तिनं निवृत्ती घेतली. त्यानंतर 2013 आणि 2016 मध्ये दोन मुलांना जन्म दिला.

केएल राहुल आणि अनुष्काबद्दल युजरनं केली कमेंट, भारताच्या युवा क्रिकेटपटूनं घेतलं फैलावर

बाप्पाचं विसर्जन करताना नवनीत राणा भावुक, पाहा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: September 13, 2019, 12:22 PM IST
Tags: tennis

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading