इंटरव्ह्यू संपले, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा निर्णय अजून नाही

इंटरव्ह्यू संपले, टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा निर्णय अजून नाही

यातील सहा जणांची बीसीसायची 3 सदस्यांची क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटी आज मुलाखती घेत आहे .मुलाखत घेणाऱ्या तीन सदस्यीय टीममध्ये सचिन तेंडुलकर,व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि सौरभ गांगुलीही आहेत.

  • Share this:

10जुलै: टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नावावर शिक्कमोर्तब आज काही होऊ शकली नाही. रवी शास्त्री, सहवाग, मुडी, सिमन्स, पायबस आणि राजपूत यांच्या मुलाखती झाल्या. पण क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटी काही निर्णय घेऊ शकली नाही. सौरव गांगुली म्हणाला, आम्हाला अजून थोडा वेळ हवाय.

आयसीसी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दारूण पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाला कोचची गरज आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तब्बल 10 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिर्चर्ड पायबस, लालचंद राजपूत, लान्स क्लुझनर, राकेश शर्मा आणि उपेंद्र ब्रम्हचारी या सगळ्यांनी अर्ज केलाय.

यातील सहा जणांची बीसीसायची 3 सदस्यांची क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटी  आज  मुलाखती  घेत  आहे .मुलाखत घेणाऱ्या  तीन सदस्यीय टीममध्ये सचिन तेंडुलकर,व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि सौरभ गांगुलीही आहेत.

यातील सचिन तेंडुलकर स्काइपवरून मुलाखतींना उपस्थित राहणार आहे. भारतीय टीमचा पुढचा कोच होईल हे आज संध्याकाळपर्यंत कळेल.रवी शास्त्री आणि विरेंद्र सेहवाग हे या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 12:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading