Home /News /sport /

कोरोनामुळे आयपीएल स्थगित, आता टीम इंडियाच्या आणखी एका सीरिजवर संकट

कोरोनामुळे आयपीएल स्थगित, आता टीम इंडियाच्या आणखी एका सीरिजवर संकट

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. यानंतर आता टीम इंडियाच्या (Team India) आणखी एका सीरिजवर संकट ओढावलं आहे.

    मुंबई, 8 मे : कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. कोलकाता नाईड रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबादचे (SRH) खेळाडू, तसंच चेन्नई सुपरकिंग्सचे (CSK) खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल स्थगित केल्यानंतर आता टीम इंडियाच्या आणखी एका सीरिजवर संकट ओढावलं आहे. इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (ICC World Test Championship Final) खेळल्यानंतर भारतीय टीम झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार होती. झिम्बाब्वे दौरा उरकून टीम इंडिया पुन्हा इंग्लंडमध्ये (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी परतणार होती, पण कोरोना संकटामुळे भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यातली सीरिज रद्द होणार, हे जवळपास निश्चित आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे खेळणार होती. ही वनडे सीरिज 2020-2022 आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग होती. तसंच 2020 साली भारतीय टीम झिम्बाब्वेमध्ये जाऊन 3 टी-20 मॅचची सीरिजही खेळणार होती, पण कोरोना व्हायरसमुळे ही सीरिज तेव्हा पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे जुलै महिन्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज व्हायची शक्यता होती, यामुळे भारतीय टीमला आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठीची तयारी करण्याचीही संधी मिळाली असती, पण कोरोनामुळे ही शक्यताही आता मावळली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून या कालावधीमध्ये होणार आहे. तसंच भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरूवात होईल. म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल संपल्यानंतर जवळपास 42 दिवस भारतीय टीम इंग्लंडमध्येच थांबेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, Team india

    पुढील बातम्या