मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: रिषभ पंत व्हाईस कॅप्टन, मग संजू सॅमसनचं काय होणार? पाहा कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग XI?

Ind vs NZ: रिषभ पंत व्हाईस कॅप्टन, मग संजू सॅमसनचं काय होणार? पाहा कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग XI?

रिषभ पंत की संजू सॅमसन?

रिषभ पंत की संजू सॅमसन?

Ind vs NZ: टी20 संघाच्या तुलनेत भारतीय संघात बरेच बदल अपेक्षित आहेत. पण प्लेईंग इलेव्हन निवडताना एक प्रश्न मात्र धवनला नक्कीच सतावणार आहे तो म्हणजे विकेट किपर म्हणून कुणाला संधी द्यावी? रिषभ पंत की संजू सॅमसन?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 24 नोव्हेंबर: न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली टीम इंडिया शुक्रवारपासून यजमान संघाविरुद्ध वन डे मालिका खेळणार आहे. हार्दिक पंड्याच्या भारतीय संघानं यजमानांचा टी20 मालिकेत 1-0 असा पराभव केला होता. पण आता वन डेत शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. टी20 संघाच्या तुलनेत भारतीय संघात बरेच बदल अपेक्षित आहेत. पण प्लेईंग इलेव्हन निवडताना एक प्रश्न मात्र धवनला नक्कीच सतावणार आहे तो म्हणजे विकेट किपर म्हणून कुणाला संधी द्यावी? रिषभ पंत की संजू सॅमसन?

संजू सॅमसनला संधी मिळणार?

संजू सॅमसनला टी20 मालिकेत संधी मिळाली नाही. त्यावरुन अनेक क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनावर टीकाही केली होती. पण वन डे संघाचा विचार करता रिषभ पंत हा भारतीय संघाचा या दौऱ्यासाठी उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याची टीममधली जागा फिक्स आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसन खेळणार की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित राहिला आहे.

हेही वाचा - Ind vs NZ: भारत-न्यूझीलंड वन डे पाहण्यासाठी सकाळी 'हा' अलार्म करा सेट... पाहा किती वाजता सुरु होणार मॅच?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजूनची दमदार कामगिरी

टी20 वर्ल्ड कपआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका वन डे मालिका खेळवण्यात आली होती. त्या मालिकेत संजू सॅमसननं दमदार फलंदाजी करत तिन्ही सामन्यात नॉट आऊट राहताना 118 धावा फटकावल्या होत्या. पण महत्वाची बाब ही की टी20 वर्ल्ड कप संघात असल्यानं रिषभ पंत त्या मालिकेत खेळला नव्हता. त्यामुळे संजू सॅमसनला विकेट किपर म्हणून तिन्ही मॅचमध्ये सहज जागा मिळाली. पण आता रिषभ पंत टीममध्ये असताना संजू सॅमसनला संधी मिळणार का? हे पाहावं लागेल.

भारताचा संभाव्य संघ - शिखर धवन (कॅप्टन), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुड्डा/संजू सॅमसन, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.

भारत वि. न्यूझीलंड

पहिली वन डे, ऑकलंड

भारतीय वेळेनुसार सकाळी 7.00 वाजता

अॅमेझॉन प्राईमवर थेट प्रक्षेपण

First published:

Tags: Sports, Team india