मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: टीम इंडियाचं 'मिशन टी20 वर्ल्ड कप' संकटात? रोहितसमोर ही आहे सर्वात मोठी समस्या

T20 World Cup: टीम इंडियाचं 'मिशन टी20 वर्ल्ड कप' संकटात? रोहितसमोर ही आहे सर्वात मोठी समस्या

टीम इंडियाचं 'मिशन टी20 वर्ल्ड कप' संकटात?

टीम इंडियाचं 'मिशन टी20 वर्ल्ड कप' संकटात?

T20 World Cup: बुमराकडे तिन्ही फॉरमॅटचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे त्याचं संघात नसणं अनेक दृष्टीनं भारताच्या फायद्याचं नाही. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजी हाही एक चर्चेचा विषय बनली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 29 सप्टेंबर: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे पुन्हा एकदा जायबंदी झाल्यानं भारतीय संघव्यवस्थापन अडचणीत सापडलं आहे. किंबहुना टीम इंडियाच्या 'मिशन टी20 वर्ल्ड कप'ला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांवर बुमरासारखा बॉलर भारतीय संघात नक्कीच हवा. भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता सध्याच्या भारतीय संघातला तोच एक अनुभवी गोलंदाज आहे. बुमराकडे तिन्ही फॉरमॅटचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे त्याचं संघात नसणं अनेक दृष्टीनं भारताच्या फायद्याचं नाही. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजी हाही एक चर्चेचा विषय बनली आहे.

भारतीय बॉलिंग आणि मिशन टी20 वर्ल्ड कप

आशिया कपपासून टीम इंडियाची बॉलिंग हा कळीचा मुद्दा आहे. सध्याच्या भारतीय संघात भुवनेश्वर कुमार हा एकमेव अनुभवी गोलंदाज आहे. त्यानं आजवर 79 आंतरराष्ट्रीय टी20 सामने आणि 146 आयपीएल सामने खेळले आहेत. पण गेल्या काही सामन्यात भुवनेश्वरचा टप्पा हरवलेला दिसत आहे. तो महागडा ठरतोय. अशावेळी बुमरा हा टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधला महत्वाचा शिलेदार मानला जात होता. कारण बुमरा आणि भुवीशिवाय भारतीय संघात असलेल्या हर्षल पटेल, अर्शदीप सिंग यांच्या गाठीशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुरेसा अनुभव नाही.

हेही वाचा - T20 World Cup: बुमराच्या जागी कुणाला संधी? शमी, दीपक चहरऐवजी 'या' बॉलरची होतेय चर्चा

बॅटिंग लाईन अप मजबूत पण...

आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी पाहता बरेच सामने हे भारतीय फलंदाजांनी एकहाती जिंकून दिले आहेत. पण काही सामन्यात 200 च्या वर धावा करुनही टीम इंडियाला खराब बॉलिंगमुळे पराभव स्वीकारावा लागला आहे. एकूणच रोहित शर्मासमोर वर्ल्ड कपमध्येही बॉलिंग अटॅक ही सर्वात मोठी समस्या ठरणार आहे.

हेही वाचा - T20 World Cup Breaking: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का, वर्ल्ड कपमधून रोहितचा हुकमी एक्का 'आऊट'

आधी जाडेजा, आता बुमरा

आशिया कप स्पर्धेदरम्यान अवघे दोन सामने खेळून टीम इंडियाचा डावखुरा स्पिनर रवींद्र जाडेजाला दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियातल्या टी20 वर्ल्ड कपसाठी त्याच्या नावाची चर्चा झाली नाही. कारण जाडेजालाही त्या दुखापतीतून सावरण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यात आता बुमराच्या दुखापतीमुळे रोहित शर्माचं मिशन टी2 वर्ल्ड कप संकटात सापडल्याची चिन्ह आहेत.

First published:

Tags: Cricket, Cricket news, T20 world cup 2022, Team india