वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघाचा आहे 'मास्टर प्लॅन', सराव नव्हे तर 'ही' आहे योजना!

वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघाचा आहे 'मास्टर प्लॅन', सराव नव्हे तर 'ही' आहे योजना!

विश्वचषकाला अवघे 10 दिवस उरले असताना, भारतीय संघ सराव नाही तर करत आहेत मजा.

  • Share this:

लीड्स, 20 मे : क्रिकेटच्या विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा कोणती असेल तरी, ती म्हणजे वर्ल्ड कप. यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे खेळली जात आहे. दरम्यान विश्वचषकाला केवळ 10 दिवस उरले असताना, सर्व संघ सध्या संघबांधणीवर भर देत आहेत. मात्र भारतीय संघाचा वेगळाच प्लॅन आहे.

30 मेपासून विश्वचषकाला सुरुवात होत असून, सर्व संघांच्या ट्रेनिंग कॅम्पला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारताचा पहिला सामना हा 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. मात्र आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक खेळणारा भारतीय संघ सध्या ट्रनिंग नाही तर सुट्टीवर आहे.

भारतीय संघाच्या व्यवस्थापन गटानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक खेळणार असल्यामुळं सध्या त्यांना आरामाची गरज आहे. लगेचच सरावाला सुरुवात केली तर, खेळाडूंच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामळं 21मेपर्यंत खेळाडूंना विश्रांतीकरिता वेळ देण्यात आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचे खेळाडू 21 मे रोजी मुंबईत एकत्रित होतील आणि 22 मे रोजी सकाळी भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होईल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या खेळाडूंना आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबीयांसोबत फिरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळंच आयपीएलमध्ये आपल्या संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा सध्या आपली पत्नी आणि मुलगी यांच्यासह मालदिवमध्ये मज्जा करत आहे.तर, भारताचा आघाडीचा युवा फिरकीपटून युजवेंद्र चहल सध्या गोवामध्ये आराम करत आहे.

वाचा- बाप मैदानावर खेळत असताना मुलीने घेतला अखेरचा श्वास

वाचा- इंग्लंडचे दोन विश्विक्रम, पाकविरुद्ध 4-0 ने मालिका विजय


EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी है, दुसरी इंदिरा गांधी है...' पाहा UNCUT मुलाखत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 02:11 PM IST

ताज्या बातम्या