मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Zim: धवन-गिलची अभेद्य भागीदारी, टीम इंडियाकडून झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनी धुव्वा

Ind vs Zim: धवन-गिलची अभेद्य भागीदारी, टीम इंडियाकडून झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनी धुव्वा

शिखर धवन आणि शुभमन गिल

शिखर धवन आणि शुभमन गिल

Ind vs Zim: शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीनं 190 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. या दोघांनीही नाबाद अर्धशतकं झळकावली. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
हरारे, 18 ऑगस्ट: शिखर धवन आणि शुभमन गिल या सलामीवीरांच्या 192 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे टीम इंडियानं झिम्बाब्वे दौऱ्यातल्या पहिल्याच वन डेत दणदणीत विजय साजरा केला. भारतानं या सामन्यात झिम्बाब्वेचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. झिम्बाब्वेनं दिलेलं 190 धावांचं लक्ष्य भारतीय संघानं 31 व्या षटकात पार केलं. धवननं 113 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळी 9 चौकारांचा समावेश होता. तर शुभमन गिलनंही 72 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 82 धावा फटकावल्या. या विजयासह भारतीय संघानं तीन वन डे सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा त्याआधी दीपक चहर, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाच्या भेदक आक्रमणासमोर झिम्बाब्वेचा डाव 40.3 षटकात 189 धावात आटोपला. सहा महिन्यानंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज दीपक चहरनं सातव्याच षटकात भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर ठराविक अंतरानं झिम्बाब्वेचे फलंदाज बाद होत गेले. चहरनं 27 धावात 3 विकेट्स आपल्या नावावर करत वन डेत जोरदार कमबॅक केलं. चहरपाठोपाठ अक्षर पटेलनंही आपल्या फिरकीच्या जोरावर यजमान संघाच्या फलंदाजांना नाचवलं. त्यानं सेट झालेल्या रेगिस चकाबावाची विकेट काढून मोठा अडसर दूर केला. चकाबावानं सर्वाधिक 35 धावांचं योगदान दिलं. अक्षर पटेलनं 7.3 षटकात 2 षटकं निर्धाव टाकताना अवघ्या 24 धावात 3 विकेट्स घेतल्या. चहर आणि पटेलला युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानंही सुरेख साथ दिली. कृष्णानंही 50 धावात 3 फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. इवान्स-एनगारावान झुंजवलं दरम्यान झिम्बाब्वेची एकवेळ 8 बाद 110 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर ब्रॅड इवान्स आणि एनगरावानं नवव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे झिम्बाब्वेला 189 धावांचा टप्पा गाठता आला. इवान्सनं ना. 33 धावांचं योगदान दिलं. तर एनगरावानं  34 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून  वन डेत 9व्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. प्रसिद्ध कृष्णानं एनगारावाची विकेट काढत ही जोडी फोडली.
First published:

Tags: Shikhar dhawan, Sports, Team india

पुढील बातम्या