भारताचा श्रीलंकेवर एक डाव 239 धावांनी दणदणीत विजय

भारताचा श्रीलंकेवर एक डाव 239 धावांनी दणदणीत विजय

टीम इंडियानं नागपूर कसोटीमध्ये शानदार विजय मिळवलाय. भारतानं श्रीलंकेचा एक डाव आणि २३९ धावांनी पराभव केला.

  • Share this:

28 नोव्हेंबर : टीम इंडियानं नागपूर कसोटीमध्ये शानदार विजय मिळवलाय. भारतानं श्रीलंकेचा एक डाव आणि २३९ धावांनी पराभव केला. आर.अश्विननं चार विकेट्स घेतल्या.तर ईशांत शर्मा,रविंद्र जाडेजा, उमेश यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. आणि चौथ्या दिवशी लंचनंतरच सामना खिशात घातला.

भारतीय टीमनं या कसोटीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी आपली ताकदज पुन्हा एकदा दाखवून दिली. पहिल्याच डावात भारतानं ६१० रन्सचा डोंगर उभा केला. चार फलंदाजांनी शतक केलं. तर कर्णधार विराट कोहलीनं द्विशतक केलं. त्यानंतर भारतीय गोलदांजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज तग धरू शकले नाही. आणि चौथ्या दिवशी डावानं कसोटी हरण्याची नामुष्की श्रीलंकेवर आली.

तीन कसोटींच्या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतलीये. तिसरी आणि शेवटची कसोटी दिल्लीला होणार आहे.

First published: November 27, 2017, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading