मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Team India पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, 15 वर्षांनंतर होणार हाय व्होल्टेज क्रिकेट!

Team India पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, 15 वर्षांनंतर होणार हाय व्होल्टेज क्रिकेट!

टीम इंडियाने 2008 नंतर पाकिस्तानचा (India vs Pakistan) दौरा केला नाही, पण 2023 साली भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ शकते. शुक्रवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली.

टीम इंडियाने 2008 नंतर पाकिस्तानचा (India vs Pakistan) दौरा केला नाही, पण 2023 साली भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ शकते. शुक्रवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली.

टीम इंडियाने 2008 नंतर पाकिस्तानचा (India vs Pakistan) दौरा केला नाही, पण 2023 साली भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ शकते. शुक्रवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली.

मुंबई, 16 ऑक्टोबर : टीम इंडियाने 2008 नंतर पाकिस्तानचा (India vs Pakistan) दौरा केला नाही, पण 2023 साली भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ शकते. शुक्रवारी आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली, या बैठकीत 2023 सालच्या आशिया कपच्या (Asia Cup 2023) आयोजनाची जबाबदारी पाकिस्तानला देण्यात आली. 2023 साली वनडे वर्ल्ड कपचं (ICC World Cup 2023) आयोजनही भारतात होणार आहे, त्यामुळे पाकिस्तानची टीम भारतात येणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) 24 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत 2023 आशिया कपची जबाबदारी पाकिस्तानला आणि 2022 आशिया कपची जबाबदारी श्रीलंकेला देण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान आता त्रयस्थ ठिकाणी स्पर्धांचं आयोजन करणार नाही, असं पीसीबीने आधीच स्पष्ट केलं होतं. आशिया कपचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा या बैठकीमध्ये सामील झाले होते. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या टीमने नुकताच सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानचा दौरा रद्द केला होता.

टीम इंडिया याआधी 2008 साली पाकिस्तान दौऱ्यावर आशिया कप खेळण्यासाठीच गेली होती. स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले, यातल्या एका मॅचमध्ये भारताचा आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला. टीम इंडियाचा ज्या मॅचमध्ये विजय झाला त्यात वीरेंद्र सेहवागने 119 रनची खेळी केली होती, याशिवाय सुरेश रैनाने 84 रनची विस्फोटक खेळी केली होती.

पाकिस्तानच्या जमिनीवर वनडेमध्ये भारताची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. या दोन्ही टीममध्ये पाकिस्तानमध्ये 27 वनडे झाल्या, यातल्या 11 भारताने जिंकल्या, तर 14 मॅच जिंकण्यात पाकिस्तानला यश आलं. दोन मॅचचा निकाल लागला नाही. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताने पाकिस्तानात 53 मॅच खेळल्या, यात 13 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आणि 21 मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला.

First published:

Tags: BCCI, Cricket, India vs Pakistan, Team india