Home /News /sport /

कोरोना संकटात टीम इंडिया असा करणार इंग्लंडचा खडतर प्रवास

कोरोना संकटात टीम इंडिया असा करणार इंग्लंडचा खडतर प्रवास

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर आता टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंडमध्ये जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18 ते 22 जूनपर्यंत खेळवली जाईल, यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मे : कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर आता टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंडमध्ये जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18 ते 22 जूनपर्यंत खेळवली जाईल, यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळेल. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होईल. इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय टीमला एक आठवडा क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय टीम 25 मे रोजी मुंबईमध्ये एकत्र येईल, यानंतर 8 दिवस ते बायो-बबलमध्ये राहतील. या कालावधीत दोन ते तीन वेळा खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात येईल. 2 जूनला भारतीय टीम इंग्लंडला रवाना होईल. तिकडे पोहोचल्यानंतर खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. यानंतर 18 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला साऊथम्पटनमध्ये सुरुवात होईल. भारतीय नागरिकांना सध्या ब्रिटनमध्ये प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे, पण खेळाडूंना तिकडे जायला परवानगी आहे, पण त्यांना सरकारने निश्चित केलेल्या हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. पण बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड खेळाडूंना तीनच दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे, कारण भारतीय खेळाडू आधीच इकडे 7 दिवस क्वारंटाईन होऊन इंग्लंडला रवाना होणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी 20 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला संधी मिळाली नाही. तर रविंद्र जडेजाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरूवात होईल. नॉटिंगहममध्ये ही टेस्ट खेळवली जाईल, तर दुसरी टेस्ट 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर, तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून लीड्सवर, चौथी टेस्ट ओव्हलमध्ये 2 सप्टेंबरपासून आणि पाचवी टेस्ट 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय टीम विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव केएल राहुल आणि ऋद्धीमान साहा फिट झाले तर तेदेखील भारतीय टीमसोबत इंग्लंडला जातील. स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या