मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC नं जाहीर केले दशकातील सर्वोत्तम खेळाडू, 'या' भारतीयांनी मारली बाजी

ICC नं जाहीर केले दशकातील सर्वोत्तम खेळाडू, 'या' भारतीयांनी मारली बाजी

इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजे ICC नं दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची नावं (icc team of the decade) जाहीर केली आहेत. या यादीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) बाजी मारली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 डिसेंबर : इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजे ICC नं दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या यादीमध्ये (icc awards 2020) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) बाजी मारली आहे. विराटला सर्वात प्रतिष्ठेचा दशकातला सर्वोत्तम खेळाडूसाठी देण्यात येणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू म्हणून देखील विराटचीच निवड झाली आहे.

विराट कोहलीनं हे संपूर्ण दशक त्याच्या बॅटिंगनं गाजवलं आहे. त्यामुळे एकूण चार गटातील पुरस्कारासाठी  (icc awards 2020) त्याला नामांकन मिळाले होते. दशतकातील सर्वोत्तम खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू अशा चार गटात विराटला नामांकन मिळालं होतं. त्यापैकी दोन पुरस्कार विराटला मिळाले आहेत. यापूर्वी विराटचा दशकातील तीन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम टीममध्ये समावेश करण्यात आला होता. तीन्ही टीममध्ये समावेश झालेला विराट हा एकमेव खेळाडू आहे.

दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू (icc best player of decade )म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) निवड झाली आहे. तर सर्वोत्तम टी-20 खेळाडूचा पुरस्कार अफगाणिस्तानच्या राशिद खाननं (Rashid Khan) पटकावला आहे.

धोनीला विशेष पुरस्कार

खेळाडू भावना जपण्यासाठी देण्यात येणाऱ्या दशकातील ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी आयसीसीच्या पॅनलनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची निवड केली आहे. इंग्लंडविरुद्ध 2011 साली झालेल्या टेस्टमध्ये इयान बेलला आऊट झाल्यानंतरही परत बोलवण्याची खिलाडू वृत्ती धोनीनं दाखवली होती. त्याचा ICC नं हा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

आयसीसीनं यापूर्वी रविवारी तिन्ही प्रकाराती दशकातील सर्वोत्तम टीमची घोषणा केली होती.

पुरुष टी-20 टीम

रोहित शर्मा, क्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा

पुरुष वनडे टीम

रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इम्रान ताहीर, लसिथ मलिंगा

पुरुष टेस्ट टीम

एलिस्टर कूक, डेव्हिड वॉर्नर, केन विलियमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा, बेन स्टोक्स, आर.अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसरन

First published:

Tags: Cricket