लंडन, 6 जुलै : ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. इंग्लंडच्या (England) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे, यातले 3 खेळाडू आणि इतर 4 जण सपोर्ट स्टाफमधले आहेत. 7 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजआधी इंग्लंडला (England vs Pakistan) संपूर्ण टीमच बदलावी लागली आहे. दुसरीकडे टीम इंडियाचे (Team India) खेळाडू 20 दिवस बायो-बबलच्या बाहेर आहेत. काही खेळाडू तर गर्दीच्या ठिकाणी जात आहेत, त्यामुळे त्यांना कोरोना व्हायचा धोका अधिक आहे.
भारतीय खेळाडू 14 जुलैला लंडनमध्ये एकत्र येणार आहेत, यानंतर दोन आठवडे सराव सत्र आणि एक सराव सामना होणार आहे. एकीकडे इंग्लंडमध्ये कोरोना संकट वाढत असताना बीसीसीआय खेळाडूंना त्यांची सुट्टी रद्द करायला सांगेल, असं वाटत होतं, पण असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या मुद्द्यावरून पीटीआयशी संवाद साधला. 'आम्हाला परिस्थितीची माहिती आहे. जर सध्याच्या नियमांमध्ये काही बदल झाले तर इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि स्थानिक आरोग्य अधिकारी आम्हाला याबाबत माहिती देतील. या नियमांचं पालन केलं जाईल. अजूनपर्यंत आम्हाला असं काही सांगण्यात आलेलं नाही, त्यामुळे खेळाडूंना त्यांची सुट्टी रद्द करायला सांगण्यात आलेलं नाही,' असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
टीम इंडियाचे खेळाडू सध्या लंडन आणि आसपासच्या परिसरात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर काही जण इंग्लंडच्या ग्रामीण भागात गेले आहेत. टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) तर युरो कप (Euro Cup) बघण्यासाठी गेला होता. तिकडे स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणावार गर्दी होती. खेळाडू लंडनमध्ये पुन्हा एकत्र आल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे, यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये पाठवलं जाईल. इंग्लंडमध्ये डेल्टा-3 व्हायरसच्या केसेस वाढत आहेत. इंग्लंडच्या सगळ्या खेळाडूंचं लसीकरणही पूर्ण झालेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, England, Team india