मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

VIDEO : इंग्लंडला जाण्याआधी क्वारंटाईन सेंटरमध्ये भारतीय खेळाडू करतायत हे काम

VIDEO : इंग्लंडला जाण्याआधी क्वारंटाईन सेंटरमध्ये भारतीय खेळाडू करतायत हे काम

टीम इंडिया (Team India) 3 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय खेळा़डूंनी जोरदार ट्रेनिंग सुरू केलं आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 31 मे : टीम इंडिया (Team India) 3 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू होईल. या मॅचनंतर दीड महिना भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहणार आहे. 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होईल. इंग्लंडला रवाना होण्याआधी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू जोरदार ट्रेनिंग करताना दिसत आहेत. इंग्लंडला रवाना होण्याआधी खेळाडू मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाले आहेत. याठिकाणी खेळाडूंना जिम आणि ट्रेनिंगची पूर्ण सुविधा आहे. टीम इंडियाचे ट्रेनर सोहम देसाई यांनी भारतीय खेळाडूंच्या ट्रेनिंगविषयी माहिती दिली. 'मला आणि निक वेब यांना खेळाडूंना आराम देणं योग्य वाटत आहे. मागच्या एका वर्षापासून ते लागोपाठ क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे तीन आठवड्यांचा आराम त्यांना ताजातवाना करण्यासाठी चांगला आहे. आम्ही खेळाडूंना पूर्णपणे आराम करायला आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला सांगितलं. आता आम्ही अशा गोष्टींवर लक्ष देत आहोत, ज्या सिझन सुरू असताना करता येत नाहीत,' असं सोहम देसाई म्हणाले. 'ट्रेनिंगला परवानगी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. खेळाडू बाहेरही जाऊ शकतात. आम्ही त्यांना कमजोरीवर लक्ष द्यायला सांगितलं, तसंच 7व्या, 8व्या आणि 9व्या दिवशी आम्ही त्यांना आवडीचं ट्रेनिंग करण्याची परवानगी दिली. इंग्लंडला जाण्यासाठी आम्ही तयार आहोत,' अशी प्रतिक्रिया सोहम देसाई यांनी दिली.
First published:

Tags: Cricket, India vs england, Team india

पुढील बातम्या