• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार

WTC फायनलनंतर टीम इंडियाचा या देशाचा दौरा, वनडे आणि T20 सीरिज खेळणार

आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर आता टीम इंडियाचे (Team India) खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship Final) तयारी करणार आहेत.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : आयपीएल (IPL 2021) स्थगित झाल्यानंतर आता टीम इंडियाचे (Team India) खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship Final) तयारी करणार आहेत. 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. या मॅचनंतर भारतीय टीमला श्रीलंकेत (India vs Sri Lanka) 3 वनडे आणि 5 टी-20 खेळवण्यासाठी पाठवण्याची योजना आहे, असं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं. म्हणजेच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय टीम इंग्लंडहून श्रीलंकेला जाऊ शकते. सौरव गांगुली (Sourav Ganguly) स्पोर्ट्स स्टारसोबत बोलत होता. भारताला श्रीलंकेत 3 वनडे आणि 5 टी-20 खेळायच्या आहेत. हा दौरा जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे, पण दौऱ्याच्या वेळापत्रकाची अजून घोषणा झालेली नाही. पण या दौऱ्यामुळे खेळाडूंसमोर अडचण निर्माण होऊ शकते. भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला रवाना होईल, यानंतर 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. हा सामना झाल्यानंतर टीमला पुन्हा श्रीलंकेला जावं लागेल, तसंच श्रीलंका दौरा झाल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी त्यांना पुन्हा इंग्लंडमध्ये यावं लागेल. ऑगस्ट महिन्यापासून भारत-इंग्लंड (India vs England) टेस्ट सीरिजला सुरूवात होईल. भारतीय टीम कोरोनाच्या संकटात लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये आयपीएल झाली, यानंतर भारतीय टीम नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत ऑस्ट्रेलियात होती. यानंतर जानेवारी ते मार्च घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्धची सीरिज झाली आणि मग आयपीएल सुरू झाली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोना झाल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली. सप्टेंबर महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावरून परत येईल, त्यामुळे आयपीएल झाली नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज प्रस्तावित आहे. या सीरिजला टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणूनही पाहिलं जात आहे, पण टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) भारतातल्या आयोजनाबाबतही शंका आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातला टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो.
  Published by:Shreyas
  First published: