लंडन, 8 सप्टेंबर : भारतीय टीम सध्या इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज (India vs England) खेळत आहे. सीरिजची पाचवी म्हणजेच अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये होणार आहे. हा सामना संपल्यानंतर भारतीय टीम आयपीएल (IPL 2021) खेळण्यासाठी युएईला जाईल, यानंतर तिकडेच टी-20 वर्ल्ड कपही (T20 World Cup) होणार आहे. पण पुढच्या वर्षी भारतीय टीम पुन्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर जाईल. या दौऱ्यात तीन टी-20 (T20 Series) आणि तीन वनडे मॅचची सीरिज (ODI Series) होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
ईसीबीने दिलेल्या माहितीनुसार भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सीरिजला 1 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला टी-20 सामना मॅनचेस्टरमध्ये होईल. 3 जुलैला दुसरी टी-20 नॉटिंघममध्ये तर अखेरची टी-20 मॅच 6 जुलैला साऊथम्पटनमध्ये होईल. यानंतर तीन मॅचची वनडे सीरिज खेळवली जाईल. पहिली वनडे 9 जुलैला बर्मिंघममध्ये, दुसरी वनडे 12 जुलैला ओव्हलमध्ये आणि तिसरी वनडे 14 जुलैला लॉर्ड्सवर होईल.
2022 साली न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट सीरिज
इंग्लंडची टीम 2022 साली न्यूझीलंडविरुद्ध 3 टेस्ट मॅचची सीरिजही खेळणार आहे. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) भाग आहे. 2 ते 27 जूनदरम्यान ही टेस्ट सीरिज होईल. याशिवाय इंग्लंड जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहे. यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 3 मॅचची टेस्ट सीरिज होणार आहे.
इंग्लंडमध्ये झाल्या 3 टी-20 सीरिज
भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये आतापर्यंत 3 टी-20 सीरिज झाल्या. यातल्या दोन सीरिज इंग्लंडने आणि एक भारताने जिंकली. 2011 आणि 2014 साली टी-20 सीरिजच्या फक्त एक-एक मॅच झाल्या. या सीरिजमध्ये इंग्लंडचा विजय झाला. तर 2018 साली झालेल्या 3 मॅचच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-1 ने विजय झाला.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.