INDvsBAN : बांगलादेशविरुद्ध मालिकेत टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ

2 नोव्हेंबरपासून बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 07:17 PM IST

INDvsBAN : बांगलादेशविरुद्ध मालिकेत टीम इंडियात होणार मोठे बदल, 'या' तारखेला जाहीर होणार संघ

रांची, 22 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 आणि कसोटीमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेश विरोधात मालिका खेळणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-20 आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. दरम्यान यासाठी टी-20 आणि कसोटी सामन्यांसाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा 24 ऑक्टोबरला केली जाणार आहे.

या मालिकेत तीन टी-20 सामने आधी खेळले जाणार आहेत, त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. भारतीय निवड समिती मुंबईत 24 ऑक्टोबरला याबाबत घोषणा करणार आहे. यावेळी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे की नाही, तसेच धोनी खेळणार आहे का?, या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

वाचा-‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप

धोनीला मिळणार का संधी?

यावेळी संघाची निवड करताना सगळ्यांचे लक्ष असणार आहे ते महेंद्रसिंग धोनीवर. वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात धोनीला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळं बांगलादेश विरोधात विराटला विश्रांती देत धोनीला संघात स्थान मिळू शकते.

Loading...

गांगुली करणार विशेष चर्चा

बांगलादेश विरोधात निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद 15 खेळाडूंचा संघ जाहीर करतील. याआधी 23 ऑक्टोबर रोजी एजीएम बैठकीत बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित असणार आहे. त्यानंतर 24 तारखेला संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान याआधीच गांगुलीनं धोनीशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

वाचा-पगारवाढीसाठी कर्णधारासह संपूर्ण संघ संपावर, टी-20 वर्ल्ड कप धोक्यात

या खेळाडूंनी याआधीच घेतली माघार

बांगलादेश विरोधातली मालिका ही भारतासाठी टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं महत्त्वाची असणार आहे. असे असले तरी, याआधीच भारताचे दोन मुख्य खेळाडू जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनी माघार घेतली आहे. बुमराह आणि पांड्या दोघांनाही दुखापत झाली आहे, त्यामुळं उपचारासाठी त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 सामन्यांसाठी निवडण्यात आलेला संघच या मालिकेसाठी असू शकतो.

बांगलादेशचा संघ येणार नाही भारत दौऱ्यावर?

सोमवारी बांगलादेश संघाच्या सर्व खेळाडूंनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या संघानं बोर्डासमोर पगार वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळं जर बांगलादेश क्रिकेट बोर्डानं खेळाडूंच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर भारतात होणाऱ्या मालिकेवर संकट असणार आहे. सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व महत्त्वाच्या खेळाडूंनी घेतला आहे. यात कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन, विकेटकीपर मुशफिकुर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी देशातील 50 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डासमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे.

वाचा-हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

अशी आहे टी- मालिका

पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली)

दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट)

तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर)

असा आहे बांगलादेशचा संघ- शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...