मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ऍबी कुरुविलाचं निवड समिती सदस्यपद धोक्यात? तक्रार दाखल

ऍबी कुरुविलाचं निवड समिती सदस्यपद धोक्यात? तक्रार दाखल

टीम इंडियाच्या नव्या निवड समितीचे सदस्य ऍबी कुरुविला (Abey Kuruvilla) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाच्या नव्या निवड समितीचे सदस्य ऍबी कुरुविला (Abey Kuruvilla) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाच्या नव्या निवड समितीचे सदस्य ऍबी कुरुविला (Abey Kuruvilla) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 27 डिसेंबर : टीम इंडियाच्या नव्या निवड समितीचे सदस्य ऍबी कुरुविला (Abey Kuruvilla) अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. भारतीय टीमचे माजी फास्ट बॉलर कुरुविला यांचं निवड समिती सदस्यपद धोक्यात आलं आहे, कारण त्यांच्यावर परस्पर हितसंबंधांचा आरोप झाला आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी याबाबत तक्रार केली आहे. कुरुविला डी.वाय. पाटील ऍकेडमीचा खेळ संचालक आहे, तसंच तो राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य आहे. तो दोन भूमिकांमध्ये असल्यामुळे हा परस्पर हितसंबंधांचा मुद्दा असल्याचं संजीव गुप्ता म्हणाले.

भारताकडून 10 टेस्ट आणि 25 वनडे खेळलेल्या ऍबी कुरुविला याने अजित आगरकर याला पिछाडीवर टाकत निवड समिती सदस्यपद मिळवलं. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आगरकर आणि कुरुविला यांच्या नावावर खूप वेळ चर्चा झाली, पण समितीने कुरुविलाच्या नावाला पसंती दिली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगरकरला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून समर्थन मिळालं नाही, कारण मुंबईचा मुख्य निवडकर्ता असताना आगरकरने मॅच बघितल्या नव्हत्या.

चेतन शर्मा निवड समिती अध्यक्ष

ऍबी कुरुविलासोबत देबाशिष मोहंती आणि चेतन शर्मा यांचीही निवड समितीमध्ये नियुक्ती झाली आहे. निवड समितीमध्ये सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूची निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक होते, त्यामुळे चेतन शर्मा टीम इंडियाचे निवड समिती अध्यक्ष बनले आहेत. चेतन शर्मा यांनी भारतासाठी 23 टेस्ट आणि 65 वनडे खेळल्या. नव्या निवड समितीचा कार्यकाळ इंग्लंड सीरिजपासून सुरू होईल. इंग्लंड आणि भारत यांच्यात 4 टेस्ट, 5 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे.

First published: