न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी

न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, ‘या’ युवा खेळाडूंना मिळणार संधी

24 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होईल. यात 5 टी-20, तीन एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : श्रीलंकेला टी-20 मालिकेत नमवल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ 24 जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा होईल. संघाची घोषणा होण्याआधीच हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघात जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं कोणत्या खेळाडूंनी संधी मिळेल हे पाहावे लागणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध होणारा हा दौरा भारताचा नववर्षातील पहिला विदेशी दौरा असेल. त्यामुळं या दौऱ्यात दिग्गज क्रिकेटपटूंबरोबरच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शुभमन गिल (Shubman Gill), नवदीप सैनी, कुलदीप यादव, अजिंक्‍य रहाणे, केएल राहुल, संजू सॅमसन यांना संधी दिली जाऊ शकते.

वाचा-धोनी वनडे क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?, आज होणार फैसला

सूर्यकुमार यादवला मिळणार संधी?

श्रीलंकाविरुद्ध टी-20 संघानं चांगली कामगिरी केल्यामुळे या संघात विशेष बदल केले जाणार नाहीत. तर, एकदिवसीय संघात केदार जाधवला डच्चू दिला जाऊ शकतो. जाधवची तांत्रिक त्रुटी न्यूझीलंडमध्ये उघडकीस येऊ शकेल आणि अलिकडच्या काळात बरीच षटके न खेळल्यामुळे त्याला संघातून वगळले जाऊ शकते, जर संघाला तांत्रिक सामर्थ्याचा पैलू दिसला तर अजिंक्य रहाणे परत येऊ शकेल पण जर तसे नसल्यास मुंबईच्या सूर्यकुमार यादवची आक्रमक फलंदाजी पाहता पाचव्या किंवा सहाव्या स्थानासाठी पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.

वाचा-पांड्याला मोठा धक्का, न्यूझीलंड दौऱ्यातून 'या' कारणामुळे बाहेर

राहुल कसोटी संघात करणार कमबॅक

सूर्य आणि संजू सॅमसन दोघांचाही ए संघात समावेश आहे. कसोटी संघ अत्यंत संतुलित दिसत आहे, फक्त तिसर्‍या सलामीवीरचा विचार केला जाईल. घरच्या मालिकेसाठी राखीव म्हणून निवडले गेलेला युवा शुभमन गिल तिसरा सलामीवीर म्हणून पात्र आहे पण लोकेश राहुलचा सध्याचा फॉर्म आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या अनुभवाचा विचार करता येईल. पृथ्वी शॉ दुखापतीमुळे त्रस्त आहे, त्यानंतर त्याची शक्यता कमी आहे.

वाचा-नववर्षात केएल राहुलचा दबदबा, रॅकिंगमध्ये कॅप्टन कोहलीला टाकले मागे

 असा आहे भारताचा न्यूझीलंड दौरा

24 जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होईल. यात 5 टी-20, तीन एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी आज निवड समिती 15 ऐवजी 16 किंवा 17 खेळाडूंची निवड करणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: January 12, 2020, 12:36 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading