मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: नवा कॅप्टन... नवी लढाई! पाहा कधीपासून सुरु होतेय भारत-न्यूझीलंड वन डे मालिका? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Ind vs NZ: नवा कॅप्टन... नवी लढाई! पाहा कधीपासून सुरु होतेय भारत-न्यूझीलंड वन डे मालिका? संपूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

टीम इंडियाचा वन डे कॅप्टन शिखर धवन

टीम इंडियाचा वन डे कॅप्टन शिखर धवन

Ind vs NZ: किवींविरुद्ध आता भारतीय संघ तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 23 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातली टी20 मालिका टीम इंडियानं खिशात घातली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात भारताच्या युवा संघानं यजमानांना त्यांच्याच मैदानात पराभवाची धूळ चारली. टी20 विजयानंतर आता टीम इंडिया सज्ज झाली आहे ती पुढच्या आव्हानासाठी. किवींविरुद्ध आता भारतीय संघ तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल. वन डेसाठी भारतीय संघाची धुरा शिखर धवन सांभाळणार आहे.

टीम इंडिया ऑकलंडमध्ये दाखल

उभय संघात तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत. त्यातला पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. या सामन्यासाठी धवन आणि कंपनी ऑकलंडमध्ये दाखल झाली आहे. आज भारतीय संघानं ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानात सरावही केला. टी20 मालिकेत संधी न मिळालेल्या काही खेळाडूंना वन डेत मात्र संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर ही नावं आघाडीवर आहेत.

भारत-न्यूझीलंड वन डे मालिका

25 नोव्हेंबर, पहिली वन डे - ऑकलंड

27 नोव्हेंबर, दुसरी वन डे - हॅमिल्टन

30 नोव्हेंबर, तिसरी वन डे - ख्राईस्टचर्च

वन डे मालिकेतले तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजता सुरु होणार आहेत.

हेही वाचा - FIFA WC 2022: जोश आणि जल्लोष... सौदीत साजरी झाली दिवाळी, किंग सलमाननं केली 'ही' मोठी घोषणा

भारताचा वन डे संघ -  शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप सेन, अर्शदीप,  शार्दूल ठाकूर, दीपक चहर.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Shikhar dhawan, Sports, T20 cricket