मेलबर्न, 05 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 फेरीतला शेवटचा सामना भारत आणि झिम्बाब्वे संघांमध्ये खेळवला जाणार आहे. रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना पार पडेल. टीम इंडियासाठी एका अर्थानं ही मॅच करो या मरो सारखीच असेल. पण झिम्बाब्वेच्या तुलनेत टीम इंडियाचं पारडं चांगलच जड आहे. त्यामुळे भारतीय संघाचं सेमी फायनलचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण या महत्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा टीममध्ये काही बदल करणार का? हा प्रश्न आहे.
4 सामन्यात केवळ 2 बदल
टीम इंडियानं गेल्या चार सामन्यात टीममध्ये केवळ दोन वेळाच बदल केला आहे. पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध रोहितनं एकच टीम खेळवली. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला विश्रांती देऊन दीपक हुडाला संधी दिली. टीम इंडियानं तो सामना गमावला आणि दीपक हुडाही त्या मॅचमध्ये शून्यावर बाद झाला. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध रोहितनं आपलं विनिंग कॉम्बिनेशन पुन्हा तयार केलं आणि हुडाऐवजी अक्षर पटेलला टीममध्ये घेतलं. चार मॅचमध्ये एवढे दोनच बदल भारतीय संघात पाहायला मिळाले.
हेही वाचा - Ind vs Zim: 'सुपर संडे'ला पहाटे 5.30 पासून सामने, भारत-झिम्बाब्वे मॅच 'या' वेळेत होणार सुरु
कार्तिकऐवजी पंतला संधी?
टीम इंडियाचा फिनिशर दिनेश कार्तिकनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आपल्या बॅटनं खास प्रभाव पाडलेला नाही. त्यानं तीन इनिंगमध्ये केवळ 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या जागी रिषभ पंतला संधी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण रिषभ पंतला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकदाही टीममध्ये जागा मिळाली नाही. दिनेश कार्तिकची कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्ध पंतला टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता जास्त आहे.
हेही वाचा - Ind vs Zim: भारत-झिम्बाब्वे मॅचमध्ये पाऊस पडला तर? पाहा असं असेल सेमी फायनलचं गणित
भारत वि. झिम्बाब्वे, सुपर 12 - ग्रुप 2
मेलबर्न क्रिकेट स्टेडियम, मेलबर्न
भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वा.
स्टार स्पोर्ट्स, हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण
भारताची संभाव्य प्लेईंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/रिषभ पंत, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 cricket, T20 world cup 2022