बॅट सोडून शिखर धवनने हातात धरली बासरी, ऐकून तुम्हीही व्हाल चाहते

बॅट सोडून शिखर धवनने हातात धरली बासरी, ऐकून तुम्हीही व्हाल चाहते

नेहमी मैदानात आपल्या बॅटने फलंदाजी करणारा धवनने आपली एक वेगळीच कला सर्वांना दाखवली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत खेळलेल्या शिखर धवनला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं धवनची कसोटी संघात निवड झाली नाही. दरम्यान धवन सध्या भारतात आराम करत आहे. त्यातच धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहमी मैदानात आपल्या बॅटने फलंदाजी करणारा धवनने आपली एक वेगळीच कला सर्वांना दाखवली आहे.

धवननं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला आहे, या व्हिडीओमध्ये धवन बासरी वाजवताना दिसत त्यामुळं नेहमी हातात बॅट असणाऱ्या धवनची ही कला पाहून सर्व चाहते आश्चर्यचकित झाले आहे. चाहत्यांनी धवनच्या या मधुर बासरी वादनाचे कौतुकही केले आहे. दरम्यान याआधी धवननं रस्त्यावरील मुलांना फ्लाईंग किस शिकवत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

शिखर धवनचा व्हिडिओ व्हायरल

धवननं शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांचा विश्वास नाही बसत आहे. या व्हिडिओमध्ये धवन समुद्र किनाऱ्यावर बासरी वादन करत आहे. याला धवननं एक नवीन सुरुवात, झाडं, हवा, समुद्र आणि संगीत असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-हसीन जहॉंचे सनसनाटी आरोप, शमी मैदानातून थेट तुरूंगात जाणार ?

 

View this post on Instagram

 

A fresh start.. Trees, the wind, the ocean & some music = bliss. 🎶

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

वाचा-क्रिकेटमधील ऐतिहासिक घटना, 12 सामन्यात भारतीय क्रिकेटपटू पोहचला तिसऱ्या स्थानी

इंडिया ए साठी खेळणार धवन

वेस्ट इंडिज दौऱ्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत धवननं दोन सामन्याते केवळ 20 धावा केल्या. तसेच, काही दिवसांत सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आपली जागा मिळवण्यासाठी धवननं इंडिया एकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं धवन इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने खेळणार आहे. जखमी विजय शंकरच्या जागी शिखर धवनला संघात जागा देण्यात आली आहे. दरम्यान भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 15 सप्टेंबरपासून 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

वाचा-रॅंकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली पण विराट हरला! अव्वलस्थानी पोहचला 'हा' खेळाडू

मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading