भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला होता देश, पण इंग्लंडमध्येही झाला फ्लॉप!

भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला होता देश, पण इंग्लंडमध्येही झाला फ्लॉप!

टीम इंडियात जागा मिळाली नाही म्हणून भारताच्या स्टार फलंदाजानं सोडला होता देश.

  • Share this:

लंडन, 27 सप्टेंबर : भारतीय संघात खेळत असलेल्या खेळाडूंपेक्षा संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. त्यामुळं येत्या काळात बहुतांश क्रिकेटपटूंनी आपला देश सोडत संन्यास किंवा इतर देशांकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत आता भारताच्या आणखी एक क्रिकेटपटूचे नाव सामिल झाले आहे. मात्र या क्रिकेटपटूला भारताबाहेर आपले नाव करता आले नाही.

भारत सोडून इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या या भारतीय फलंदाजाचे नाव आहे मुरली विजय. मुरली विजयनं भारतीय संघात स्थान न मिळाल्यानं त्यानं काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला काउंटी क्रिकेटमध्ये मोठा झटका बसला आहे. समरसेटमधून खेळणाऱ्या मुरली विजयला तीन सामन्यात सलामीला खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं मुरली विजयचे टीम इंडियात पुनरागमन करण्याचे दरवाजे बंद झाले आहे.

5 डावांत केल्या फक्त 42 धावा

गेल्या वर्षी एसेक्ससाठी (Essex) काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) खेळणाऱ्या मुरली विजयला तीन सामन्यात संधी मिळाली. या तिन्ही सामन्यात मुरली विजयनं निराशाजनक कामगिरी केली. त्यानं पाच डावांमध्ये 7, 0, 0, 29 आणि 6 अशा धावा केल्या. त्यामुळं टीम इंडियात पुनरागमन करणे मुरली विजयसाठी कठिण होऊ शकते.

वाचा-IPLमध्ये धमाका करणारा टीम इंडियाचा शिलेदार करणार कमबॅक? चौथ्या क्रमांकासाठी दावा

फॉर्ममध्ये नसल्याचे विजयला बसला फटका

गेल्या वर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत मुरली विजयला चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 4 सामन्यात 20 धाव ही त्याची सर्वोत्कृष्ठ खेळी ठरली. त्यानं केवळ 18.80च्या सरासरीनं धावा केल्या होत्या.

भारतीय संघासाठी खेळल्या 61 कसोटी सामने

35 वर्षीय विजयनं 61 कसोटी सामन्यात 38.28च्या सरासरीनं 3982 धावा केल्या आहेत. यात सर्वोश्रेष्ठ धावा 167 आहेत. आता मुरली विजय इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळं वाढत्या वयामुळं टीम इंडियात पुनरागमन होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.

वाचा-रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

2018मध्ये विजयला करता आली नाही चांगली खेळी

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड झालेल्या विजयला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं टीम इंडियातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या 4 कसोटी सामन्यात त्याच्या सर्वोत्कृष्ठ धावा 20 होत्या. त्यानं केवळ 18.80च्या सरासरीनं धावा केल्या.

‘मी चार वेळा कमबॅक केला आहे, माझ्यावर कोणताही दबाव नाही’

विजयनं इंग्लंडनं रवाना होण्याआधी, “निश्चित स्वरूपात मला मी प्रयत्न करत राहणार. पण भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नाही. सध्या मी जे खेळत आहे, त्यात मी समाधानी आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळं तो कसा खेळायचा हे मला माहित आहे. मी असे आधीही केले आहे”, असे मत व्यक्त केले.

वाचा-विराटची चिंता वाढली, भारताचं कसोटीतील सिंहासन धोक्यात!

SPECIAL REPORT : 'या' अवलियाच्या टाइपिंगमधून तयार होतात पोट्र्रेट!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 03:39 PM IST

ताज्या बातम्या