World Cup 2019 : आयपीएलमुळे भारतीय संघाची गुपितं होत आहेत लीक?

एकीकडं खेळाडूंच्या दुखापतींमुळं बीसीसीआयच्या अडचणी वाढल्या असताना. आता विश्वचषकाआधी संघ व्यवस्थापनासमोर नवीन समस्या.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 07:59 PM IST

World Cup 2019 : आयपीएलमुळे भारतीय संघाची गुपितं होत आहेत लीक?

मुंबई, 02 मे : आयपीएलचा बारावा हंगाम शेवटच्या आठवड्यात आला आहे तर, दुसरीकडं विश्वचषकाकरिता केवळ एका महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळं सध्या भारतीय संघ व्यवस्थापन संघ बांधणीच्या तयारीस लागला आहे. यात आता एकीकडं खेळाडूंच्या दुखापतींमुळं बीसीसीआयच्या अडचणी वाढल्या असताना. यामुळं संघ बांधणीवरुन भारतीय संघ व्यवस्थापन आयपीएलवर नाराज आहे. त्यातच आता परदेशी प्रशिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना आयपीएलमध्ये संधी दिल्यानं बीसीसीआयच्या नाराजीत वाढ झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये बहुतांश संघात प्रशिक्षक किंवा कर्मचारी स्थानावर परदेशी खेळाडू आहेत. म्हणजे दिल्ली कॅपिटल्स या संघात भारताचा सलामीवीर शिखर धवन खेळत असून, या संघाच्या प्रशिक्षकपदावर ऑस्ट्र्रेलियान संघाच्या सहप्रशिक्षक रिकी पॉंटिंग आहे. तर, दिल्लीचा संघ विश्लेषक श्रीराम सोमायाजुला हे श्रीलंकन क्रिकेट संघाचा विश्लेषक आहे. त्यामुळं अर्थातच या दोन्ही प्रशिक्षकांना धवनच्या कमकुवत बाजू आणि बलस्थान माहित आहे. त्यामुळं या गोष्टी विश्वचषकाच्या दृष्टीनं भारतीय संघाला महागात पडू शकतात.

बीसीसीआयचे धोरण समान का नाही?

दरम्यान विश्वचषकाला अवघा महिन्याभराचा कालावधी उरला असताना, त्यातच परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यामुळं खेळाडूंच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. यातच दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार सौरव गांगुली यांन रिकी पॉंटिंग हा भारतीय संघाचा चांगला प्रशिक्षक होऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. गांगुलीवर सध्या परस्पर हितसंबंधांचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकर यांच्यावरही हा आरोप करण्यात आला होता. यावर माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयचेच कान धरले होते. जर द्रविड, गांगुली, तेंडुलकर यांच्यासारखे खेळाडू जर आयपीएलचा भाग नसतील तर नुकसान कोणाचं आहे? भारतीय संघाशी किंवा इतर कोणत्या संघाशी संलग्न असलेल्या भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये संधी दिली नाही तर, त्यात खेळाडूंचे नुकसान आहे. यातच जर, भारतीय संघाच्या व्यवस्थापन टीममधले कर्मचारी जर आयपीएलमध्ये भाग घेऊ शकत नाहीत तर, विदेशी खेळाडूंसाठी सुध्दा हा नियम लागु असावा. यासाठी बीसीसीआयनं समान धोरण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळं पुढच्या आयपीएलच्या हंगामात बीसीसीआय हा नियम लागु करेल का हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.


Loading...

VIDEO : नवरदेवाने घेतला उखाणा, पण उदयनराजेंच्या अ‍ॅक्शनने नवरीच लाजली...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...