Home /News /sport /

रोहित शर्मासंदर्भात Ravi Shastri नी केले महत्वाचे विधान, म्हणाले....

रोहित शर्मासंदर्भात Ravi Shastri नी केले महत्वाचे विधान, म्हणाले....

ravi shastri

ravi shastri

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर (South Africa) विराट कोहली आणि टेस्ट कॅप्टन्सी हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) विषयी धक्कादायक विधान केले.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 24 जानेवारी: दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पराभवानंतर (South Africa) विराट कोहली आणि टेस्ट कॅप्टन्सी हा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) विषयी धक्कादायक विधान केले. तसेच त्यांनी विराट कोहलीसंदर्भातही भाष्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या क्रिकेट जगतात सुरु आहे. टेस्ट कॅप्टन्सी पदावरुन विराट कोहली पायउतार झाल्यावर कॅप्टन्सीच्या रेसमध्ये रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. एका मुलाखती दरम्यान रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, रोहित फिट असेल, तर तो नक्कीच कर्णधार बनू शकतो. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी कसोटी संघाचा रोहितला उपकर्णधार बनवले गेले होते. अशात तो आता कसोटी संघाचा कर्णधार का बनणार नाही? असा सवास उपस्थित केला. तसेच विराटबद्दल बोलताना ते म्हणाले, विराट अजूनही 2 वर्ष कसोटी संघाचे कर्णधारपद सांभाळू शकत होता. पण त्याने या पदाचा राजिनामा दिला. त्याच्या निर्णयाचे आपण स्वागत केले पाहिजे. असे वक्तव्य शास्त्री यांनी यावेळी केले. तसेच, भारतीय संघातील त्यांचा प्रशिक्षक म्हणून सात वर्षांचा कार्यकाळ समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. यासोबतच संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 2021 च्या T20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Ravi shastri, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या