मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL : श्रीलंकेत 3 नाही तर एवढ्या टी-20 मॅच खेळणार टीम इंडिया

IND vs SL : श्रीलंकेत 3 नाही तर एवढ्या टी-20 मॅच खेळणार टीम इंडिया

भारतीय क्रिकेट टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे (ODI Series) आणि टी-20 सीरिज (T-20 Series) होणार आहे.

भारतीय क्रिकेट टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे (ODI Series) आणि टी-20 सीरिज (T-20 Series) होणार आहे.

भारतीय क्रिकेट टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे (ODI Series) आणि टी-20 सीरिज (T-20 Series) होणार आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 मे : भारतीय क्रिकेट टीम जुलै महिन्यात श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे (ODI Series) आणि टी-20 सीरिज (T-20 Series) होणार आहे. सुरुवातीला दोन्ही टीममध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होईल, असं सांगितलं जात होतं, पण माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार टी-20 सीरिज तीनऐवजी 5 मॅचची होऊ शकते. श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Sri Lanka Cricket Board) या मुद्द्यावर बीसीसीआयशी (BCCI) चर्चा करत आहे.

श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताची युवा टीम जाणार आहे, कारण जुलै महिन्यात भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्येच राहणार असल्यामुळे श्रीलंकेत वेगळी टीम पाठवली जाणार आहे.

श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) टीम इंडियाचं नेतृत्व करू शकतो. या रेसमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमारही (Bhuvneshwar Kumar) आहेत. तसंच इंग्लंड दौऱ्यासाठी केएल राहुल (KL Rahul) फिट झाला नाही, तर त्याला श्रीलंका दौऱ्यासाठी पाठवलं जाऊ शकतं. केएल राहुल श्रीलंकेत गेला तर त्यालाही टीमचं नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार वनडे सीरिजची पहिली मॅच 13 जुलैला, दुसरी मॅच 16 जुलैला, तिसरी मॅच 19 जुलैला होईल, तर टी-20 सीरिजची पहिली मॅच 22 जुलै, दुसरी मॅच 24 जुलै आणि तिसरी मॅच 27 जुलैला खेळवली जाईल. भारतीय टीम 5 जुलैला श्रीलंकेत पोहोचेल आणि 28 जुलैला भारतात परतेल. भारतीय टीमला सीरिज सुरू व्हायच्या आधी एक आठवडा क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

श्रीलंका दौऱ्यात या खेळाडूंना संधी?

पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर

First published:

Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india