Home /News /sport /

T20 World Cup : 4 सीरिज ठरवणार टीम इंडियाच्या वर्ल्ड कपचे 15 खेळाडू, ICC ने मागितली नावं!

T20 World Cup : 4 सीरिज ठरवणार टीम इंडियाच्या वर्ल्ड कपचे 15 खेळाडू, ICC ने मागितली नावं!

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधी कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि टीम मॅनेजमेंट (Team India) युवा खेळाडूंना संधी देणार आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जून : टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज (India vs South Africa) 2-2 ने बरोबरीत सोडवली. आता त्यांना 26 आणि 28 जूनला आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 मॅच खेळायच्या आहेत. या सीरिजसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचा कर्णधार आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे, त्याआधी कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि टीम मॅनेजमेंट युवा खेळाडूंना संधी देणार आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडिया पहिल्याच राऊंडला बाहेर झाली, त्यामुळे यंदा निवड समितीला कोणतीच कमी ठेवायची नाही. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या सगळ्या टीमना 15 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची नावं आयसीसीला पाठवायची आहेत. प्रत्येक टीममध्ये 15 खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. टीम इंडिया 15 सप्टेंबरपर्यंत 4 सीरिज खेळणार आहे. याची सुरूवात आयर्लंड दौऱ्यापासून होणार आहे. यानंतर इंग्लंड दौऱ्यात टीम 7-10 जुलैदरम्यान 3 टी-20 मॅच खेळणार आहे. आशिया कपवर नजर टीम इंडिया जुलै-ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातही 5 टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी श्रीलंकेमध्ये टी-20 आशिया कप प्रस्तावित आहे. भारतीय टीमच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे, कारण भारताचा सामना पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या तगड्या टीमशी होईल. तिन्ही टीमनी एक-एक वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप महत्त्वाचा आहे, कारण टीमला 2013 नंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजनंतर भारताची वर्ल्ड कपची टीम जवळपास निश्चित होईल, असं टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले होते. तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही कोच राहुल द्रविड इंग्लंड दौऱ्यापासून टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात करेल, असं सांगितलं होतं. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india

    पुढील बातम्या