पुलवामा हल्ल्यातील शहिदांना टीम इंडियाने असं केलं अभिवादन

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना टीम इंडियाने असं केलं अभिवादन

शहीद झालेले जवान आणि सुरक्षादलाला अभिवादन करण्यासाठी भारताने घातली आर्मी कॅप

  • Share this:

रांची, 8 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचे खेळाडू आर्मीची कॅप घालून खेळण्यासाठी मैदानात उतरले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि सुरक्षादलाला अभिवादन करण्यासाठी भारताने आर्मी कॅप घातल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये देशवासियांनी योगदान द्यावं यासाठी भारतीय संघातील खेळाडू प्रोत्साहन देणार आहेत. रांचीत सुरू असलेल्या सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने सर्व खेळाडूंना आर्मी कॅप दिली. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघाने आर्मी कॅप घातल्याबद्दल सांगताना कर्णधार विराट कोहली म्हणाला की, ही एक खास कॅप आहे. सुरक्षादलांच्या सन्मानासाठी आम्ही ही कॅप घातली असून या सामन्याचे मानधन शहीदांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचेही त्याने सांगितले. तसेच सर्व देशवासियांनीदेखील राष्ट्रीय सुरक्षा निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन कोहलीने केले.

महेंद्र सिंग धोनी रांचीचा असल्याने भारतीय खेळाडूंचा मुक्काम धोनीच्या घरीच होता. ऋषभ पंतने खेळाडुंच्या या मुक्कामातील एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यात कोहली, धोनी आणि संघातील इतर खेळाडुही होते.

First published: March 8, 2019, 3:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading