• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • ...तर ते तुम्हाला गोळी मारतील, रवी शास्त्रींचा टीम इंडियाच्या नव्या कोचना इशारा

...तर ते तुम्हाला गोळी मारतील, रवी शास्त्रींचा टीम इंडियाच्या नव्या कोचना इशारा

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. यानंतर आपण प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याचं रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 सप्टेंबर : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. यानंतर आपण प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करणार नसल्याचं रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे. एवढच नाही तर त्यांनी या पदावर काम करणाऱ्या नव्या कोचसाठीची आव्हानं पण सांगितली आहेत. रवी शास्त्री इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टदरम्यान (India vs England 4th Test) कोरोना व्हायरसचा शिकार झाले होते. यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधल्या काही जणांनाही कोरोनाची लागण झाली. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट मॅच रद्द करण्यात आली. या सगळ्याला रवी शास्त्रींना जबाबदार धरण्यात आलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रवी शास्त्री यांनी द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली. 'भारतीय क्रिकेट टीमचा कोच ब्राझील किंवा इंग्लंडच्या फूटबॉल टीमसारखा असला पाहिजे. तुम्ही कायम बंदुकीसमोर उभे असता. 6 महिने चांगली कामगिरी केली आणि टीम 36 रनवर ऑल आऊट झाली, तर ते तुम्हाला गोळी मारतील. त्यामुळे तुम्हाला लगेच जिंकावंही लागेल. नाही तर ते तुम्हाला खाऊन टाकतील. मी जाड कातडीचा माणूस आहे, त्यामुळे मला काही फरक पडत नाही,' असं रवी शास्त्री म्हणाले. रवी शास्त्रींनंतर कोण होणार टीम इंडियाचा कोच? 4 दिग्गज रेसमध्ये! पुढच्या महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, यानंतर रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपणार आहे. या पदावर असताना आपण सगळं काही मिळवलं आहे. पद सोडताना दु:ख होईल, पण मी योग्यवेळेवर पद सोडतोय, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. 2017 साली शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाले, यानंतर 2019 साली त्यांची पुन्हा एकदा कोच म्हणून नियुक्ती झाली. 'मला सगळं काही मिळालं. टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 टीमसोबत पाच वर्ष, ऑस्ट्रेलियात दोनदा सीरिज विजय आणि इंग्लंडमध्ये मिळालेला विजय. मी या मोसमाच्या सुरुवातीला माईक अथर्टनसोबत बोललो. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं आणि कोरोनाच्या काळात इंग्लंडमध्ये विजय मिळवणं खूप खास आहे, असं मी त्याला सांगितलं. इंग्लंडमध्ये आम्ही 2-1 ने पुढे राहिलो. लॉर्ड्स आणि ओव्हलमध्ये आम्ही जशी कामगिरी केली ते खूपच स्पेशल होतं,' असं वक्तव्य शास्त्रींनी केलं. टीम इंडियाच्या स्टार बॉलरला जगापासून लपवण्याची होती कोच रवी शास्त्रींची इच्छा! इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारत 2-1 ने आघाडीवर होता, पण मॅनचेस्टरमध्ये होणारी पाचवी टेस्ट रद्द करण्यात आली. शास्त्री कोच असताना भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टी-20 सीरिज जिंकली. 'आम्ही प्रत्येक देशाला पांढऱ्या बॉलच्या क्रिकेटमध्ये त्यांच्याच मायभूमीत हरवलं. तर टीम टी-20 वर्ल्ड कप जिंकली तर याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवलं आणि इंग्लंडमध्ये आघाडी घेतली. माझ्या चार दशकांच्या क्रिकेटमधला हा सगळ्यात आनंदी क्षण आहे,' असं रवी शास्त्री म्हणाले.
  Published by:Shreyas
  First published: