रवी शास्त्रींना 'देव' पावला! पुन्हा झाली टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

रवी शास्त्रींना 'देव' पावला! पुन्हा झाली टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

Team India Head Coach : कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या समितीनं टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाची आणि मुख्य स्टाफच्या नावाची घोषणा केली. यांची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुन्हा निवड करण्यात आली आहे. 2017मध्ये याआधी रवी शास्त्री यांची निवड झाली होती. दरम्यान वर्ल्ड कपमधील पराभवानंतरही रवी शास्क्षी यांची निवड करण्यात आली आहे.

कपिल देव यांनी सकाळी मुलाखती घेण्यास सुरुवात केली. या समितीमध्ये माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटर शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. तर, या पदासाठी रवी शास्त्री, रॉबीन सिंग, लालचंद राजपूत, माईक हेसन, टॉम मूडी यांच्यात होती. मुलाखतीच्या आधीच अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी या शर्यतीतून माघार घेतली. त्याचबरोबर आज टीम इंडियातील इतर स्टाफच्या नावांचीही आज घोषणा करण्यात आली.

रवी शास्त्री यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी

प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर भारतीय संघानं नमवलं. जुलै 2017मध्ये शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तरी, आशियाई कर, ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय आणि भारताचे आयसीसी रॅकिंग यामुळं रवी शास्त्रींचा पुन्हा विचार होऊ शकतो.

विराटची पहिली पसंती होते रवी शास्त्री

कर्णधार विराट कोहलीसह संघातील खेळाडूदेखील शास्त्री प्रशिक्षक व्हावं या मताचे होतो. विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं सांगितंल होतं की, पुन्हा एकदा शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आनंद होईल. पुढच्या दोन वर्षात भारतीय संघाला आय़सीसी कसोटी चॅम्पियनशिप आणि टी20 वर्ल्ड कप खेळायचा आहे. याआधी आयएएनएसनं दिलेल्या माहितीनुसार, "सध्या काही बदल होतील असे वाटत नाही. शास्त्री आणि कोहली दोघंही एकमेकांना पुरक आहेत", असे सांगितले. तसेच, नवे प्रशिक्षक आल्यास खेळाडूंना नव्यानं सगळ्याची सुरुवात करावी लागले. टी-20 वर्ल्ड कपसाठी केवळ वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळं नवीन कोच संघाचे समीकरण बदलू शकतात. त्यामुळं रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

स्काईपवरून शास्त्रींनी दिली मुलाखत

सध्या रवी शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये असल्यामुळं स्काईपच्या माध्यमातून मुलाखत दिली. तर, लालचंद राजपूत, हेसन आणि रॉबीन सिंग प्रत्यक्षात मुलाखतीसाठी उपस्थित असतील. भारतासाठी 80 कसोटी सामने आणि 150 एकदिवसीय सामने खेळलेल्या शास्त्रींचा करार इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये संपुष्टात आला होता. मात्र, 45 दिवसांचा अतिरिक्त काळ त्यांना देण्यात आला.

प्रशिक्षकाच्या अटी

बीसीसीआयने तीन महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या. प्रमुख प्रशिक्षकाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असायला हवा. मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या देशाला दोन वर्ष प्रशिक्षण दिल्याचा अनुभव असायला हवा किंवा असोसिएट सदस्य, ए टीम, आयपीएल टीम यापैकी एकाला कमीत कमी तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असायला हवा. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी महत्त्वाची अट ही असणार आहे की, त्याने किमान 30 आंतरराष्ट्रीय कसोटी किंवा 50 एकदिवसीय खेळलेले असावे.

पुरामध्ये काढत होता सेल्फी, पाणी वाढले अन्...पाहा हा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या