मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /आयपीएल ते टी-20 वर्ल्ड कप वर्षभर खेळणार टीम इंडिया! इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल ते टी-20 वर्ल्ड कप वर्षभर खेळणार टीम इंडिया! इथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

2021 मध्ये टीम इंडियाचं (Team India) अतिशय व्यस्त वेळापत्रक आहे. या वर्षात भारतीय टीम 14 टेस्ट, 16 वने-डे आणि 23 T20 मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर IPL आणि T20 World Cup 2021 या दोन मोठ्या स्पर्धांंमध्येही भारतीय खेळाडू व्यस्त असतील.

2021 मध्ये टीम इंडियाचं (Team India) अतिशय व्यस्त वेळापत्रक आहे. या वर्षात भारतीय टीम 14 टेस्ट, 16 वने-डे आणि 23 T20 मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर IPL आणि T20 World Cup 2021 या दोन मोठ्या स्पर्धांंमध्येही भारतीय खेळाडू व्यस्त असतील.

2021 मध्ये टीम इंडियाचं (Team India) अतिशय व्यस्त वेळापत्रक आहे. या वर्षात भारतीय टीम 14 टेस्ट, 16 वने-डे आणि 23 T20 मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर IPL आणि T20 World Cup 2021 या दोन मोठ्या स्पर्धांंमध्येही भारतीय खेळाडू व्यस्त असतील.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 जानेवारी :  कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic)  2020 हे वर्ष खेळासाठी अतिशय खराब गेलं. या महामारीमुळे जवळपास सहा महिने सर्व क्रिकेट टीम मैदानापासून दूर होत्या. त्याचबरोबर व्हायरसच्या (Virus) दहशतीमुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये टीम इंडियाचं अतिशय व्यस्त वेळापत्रक आहे. या वर्षात भारतीय टीम 14 टेस्ट, 16 वने-डे आणि 23 T20 मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडून इंडियन प्रीमियर लीग (IPL), आशिया कप आणि T20 वर्ल्ड कप 2021 मध्येही सहभागी होणार आहेत.

2021 मधील टीम इंडियाचं वेळापत्रक

जानेवारी 2021

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावस्कर (Border-Gavsakar) ट्रॉफीच्या शेवटच्या दोन टेस्ट जानेवारी महिन्यात होणार आहेत. तिसरी टेस्ट 11 जानेवारीपासून सिडनीमध्ये तर चौथी टेस्ट 15 ते 19 जानेवारी दरम्यान ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. जानेवारीत टीम इंडिया (Team India) फक्त दोन टेस्ट खेळणार आहे.

फेब्रुवारी- मार्च 2021

या दोन महिन्यात भारतीय टीम इंग्लंड विरुद्ध होम सीरिज खेळणार आहे. इंग्लंडची टीम भारत दौऱ्यात चार टेस्ट, पाच टी-20, तीन वन-डे मॅचची सीरिज खेळणार आहे. पहिली टेस्ट 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरु होईल. दुसरी टेस्ट 13 फेब्रुवारीपासून चेन्नईत तिसरी 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये तर शेवटची टेस्ट 4 मार्चपासून अहमदाबादमध्ये होणार आहे.

(हे वाचा: IND vs AUS : तिसऱ्या टेस्टआधी हिटमॅन मैदानात! रोहितने सुरू केला सराव)

टेस्ट सीरिजमधील तिसरी टेस्ट अहमदाबादमध्ये डे-नाईट होणार आहे. त्यानंतर पाच टी-20 सामनेही अहमदाबादमध्ये होतील. तर तीन वन-डे मॅचची सीरिज पुण्यात खेळली जाणार आहे.

एप्रिल – मे 2021

हे दोन महिने इंडियन प्रीमियर लीगसाठी (IPL) राखीव आहेत.  कोरोना महामारीमुळे आयपीएल 2020 ही स्पर्धी युएईमध्ये झाली होती. यावर्षी ती पुन्हा भारतामध्ये होणार आहे.

जून- जुलै 2021

आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय टीम तीन वन-डे आणि पाच टी-20 साठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये श्रीलंकेत आशिया कप स्पर्धाही होईल. आशिया कप स्पर्धनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या तीन वन-डे मॅचच्या सीरिजसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो.

(हे वाचा: IND vs AUS: ‘सध्याची ऑस्ट्रेलियन टीम अस्थिर’, सचिन तेंडुलकरचं गंभीर वक्तव्य)

ऑगस्ट- सप्टेंबर 2021

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा इंग्लडमध्ये टेस्ट सीरिज खेळेल. इंग्लंडमध्ये होणारी पाच टेस्टची सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (ICC World Test Championship) महत्त्वाची आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट 4 ऑगस्टपासून सुरु होईल. तर पाचवी टेस्ट 10 सप्टेंबरपासून खेळली जाणार आहे.

ऑक्टोबर – नोव्हेंबर 2021

इंग्लंड दौऱ्यानंतर परतलेली टीम इंडिया भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी (ICC T20 World Cup 2021) होणाऱ्या या सीरिजमध्ये तीन वन-डे आणि पाच टी-20 मॅचचा समावेश आहे. त्यानंतर भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर 2021

टी-20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडिया भारतामध्ये न्यूझीलंडविरुद्धची सीरिज खेळेल. दोन टेस्ट आणि तीन टी-20 मॅचची ही सीरिज आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तीन टेस्ट आणि तीन टी-20 मॅचचा हा दौरा आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket