नवी दिल्ली, 25 जानेवारी: टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि भाजप नेता गौतम गंभीरला(Gautam Gambhir) कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. गंभीरने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. 40 वर्षीय गंभीरला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने चाचाणी केली.
सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी कोरोना चाचाणी केली. माझी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांची चाचणी करून घ्या आणि सुरक्षित रहा. असे ट्विट गंभीरने केले आहे.
After experiencing mild symptoms, I tested positive for COVID today. Requesting everyone who came into my contact to get themselves tested. #StaySafe
— Gautam Gambhir (@GautamGambhir) January 25, 2022
गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून लोकसभा खासदार आहे. तो लखनऊ सुपरजायंट्स या नवीन आयपीएल संघाचा मार्गदर्शक देखील आहे. 2018 मध्ये गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी 54 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामने खेळले. 2007 आणि 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautam gambhir