World Cup : हे वागणं बरं नव्हं ! पत्रकारांनी टाकला विराटसेनेवर बहिष्कार

World Cup : हे वागणं बरं नव्हं ! पत्रकारांनी टाकला विराटसेनेवर बहिष्कार

आयसीसीचाही भारतीय संघ प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप.

  • Share this:

लंडन, 04 जून : आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारत वगळता इतर सर्व संघांनी एक-एक सामना खेळला आहे. तरी, भारतीय संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना बुधवारी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. पण या सामन्याआधी भारतीय संघ वादात अडकला आहे. भारतीय पत्रकारांनी विराटसेनेवर बहिष्कार टाकला आहे. सोमवारी आयसीसीच्या आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय संघाने अश्या दोन खेळाडूंना पत्रकार परिषदेला पाठवण्यात आले जे वर्ल्ड कप संघाचा भाग नाही आहेत. त्यामुळं नाराज पत्रकारांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

आयसीसी वर्ल्ड कपच्या प्रोटोकॉलनुसार आयसीसी टीम संपुर्ण कार्यक्रमाची माहिती पत्रकारांना दिली जाते. यावेळी संघाच्या सरावाची आणि खेळाडूंबद्दलची माहिती पत्रकारांना दिली जाते. तर, भारतीय क्रिकेट संघ 24 मे रोजी वर्ल्ड कप खेळण्यासाठी इंग्लंडला पोहचले. त्यानंतर केवळ एकदाच पत्रकार परिषदेत झाली. बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यानंतर केएल राहुलनं पत्रकारांशी संवाद साधला होता. मात्र त्यानंतर कोणत्याही खेळाडूनं किंवा स्टाफनं पत्रकारांशी संवाद साधलेला नाही.

सोमवारी भारतीय संघ पत्रकारांशी 5 जूनला साऊथ आफ्रिकेविरोधात होणाऱ्या सामन्यासंदर्भात संवाद साधणार होता. मात्र पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधी दीपक चहर आणि आवेश खान यांना पत्रकारांशी चर्चेस पाठवण्यात आले. हे दोन्ही गोलंदाज संघाला नेट प्रक्टिससाठी मदत करतात.

या वादानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी, भारतीय संघानं एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळं ते काय बोलणार, असे उत्तर दिले. यानंतर पत्रकारांनी खेळाडूंशी संवाद साधण्याऐवजी पत्रकार परिषदेवरच बहिष्कार टाकला.

आयसीसीनंही केली आहे तक्रार

दरम्यान याबाबत आयसीसीही बीसीसीआयवर नाराज आहे. आयसीसीनं नुकतेच बीसीसीआयला प्रोटोकॉल न पाळल्याचे पत्र पाठवले होते. भारतीय संघ सामना होऊनही मीडियासमोर आलेले नाही. तर, इतर संघ विविध कार्यक्रमांना हजर असतात. त्यामुळं आयसीसीला चिंता आहे की, भारतीय संघाच्या या वागणुकीमुळं इतर संघही मीडियापासून लांब राहतील. यासंदर्भात आयसीसीनं बीसीसीआयला पत्राद्वारे खडेबोल सुनावले आहे.

वाचा-World Cup : विराटपुढे धर्मसंकट ! कोणत्या 11 खेळाडूंना मिळणार दक्षिण आफ्रिकेविरोधात संधी

वाचा-World Cup : विराटसेनेची कमाल! एकही सामना न खेळता पोहचला 7व्या क्रमांकावर, 'हे' आहे कारण

वाचा- भारतीय क्रिकेटपटूची डोपिंग चाचणी, वर्ल्ड कपमधला 'असा' एकमेव खेळाडू


CET परीक्षेचा आज निकाल, यासोबतच इतर महत्त्वाचा 18 घडामोडी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 09:56 AM IST

ताज्या बातम्या