टीम इंडियाने इंग्लंडमध्ये सेलिब्रेट केला हरलीनचा बर्थडे

भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना टीमने ऑल राऊंडर हरलीन देओलचा (Harleen Deol) वाढदिवस साजरा केला.

भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना टीमने ऑल राऊंडर हरलीन देओलचा (Harleen Deol) वाढदिवस साजरा केला.

  • Share this:
    ब्रिस्टल, 22 जून : भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना टीमने ऑल राऊंडर हरलीन देओलचा (Harleen Deol) वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. हरलीन 23 वर्षांची झाली आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात टेस्ट आणि वनडे टीममध्ये हरलीनची निवड झाली नव्हती, पण 17 खेळाडूंच्या टी-20 टीममध्ये हरलीनला संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला टीमने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात मोठ्या दिमाखात केली. ब्रिस्टलमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. टेस्टनंतर आता 27 जूनपासून ब्रिस्टलमध्येच 3 वनडे मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. यानंतर 30 जून आणि 3 जुलैला उरलेले दोन सामने टॉनटनमध्ये होतील. तसंच 9 जुलैपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. दुसरी टी-20 11 जुलैला आणि तिसरी 15 जुलैला होईल.
    हरलीनने 2019 साली इंग्लंडविरुद्ध मुंबईत वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच सामन्यात तिने 8 बॉलमध्ये 2 रन केले, पण तिला बॉलिंग मिळाली नाही कारण भारताचा 66 रनने विजय झाला. यानंतर हरलीनला भारतीय टीममधून बाहेर करण्यात आलं. हरलीनने भारताकडून 9 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या आहेत. यात तिने 18.33 च्या सरासरीने आणि 89.43 च्या स्ट्राईक रेटने 110 रन केले, याचसोबत तिला 6 विकेटही मिळाल्या. इंग्लंडविरुद्धच 2019 साली हरलीनने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केलं, आपल्या पहिल्याच टी-20 मध्ये तिने 10 बॉलमध्ये 8 रन केले, पण भारताने हा सामना 41 रनने गमावला. हिरोईनपेक्षा दिसते सुंदर, 13 व्या वर्षी क्रिकेटसाठी सोडलं घर, पाहा हरलीनचे PHOTO कोण आहे हरलीन देओल? हरलीनला विराट-अनुष्काबाबतच्या या खुलाशानंतर तिला सोशल मीडियावर जोरदार सर्च केलं जात आहे. इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीसोबत गेलेल्या अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेयर केला होता. या फोटोवर कमेंट करत हरलीन देओल म्हणाली होती, विराटने अनुष्काचा हा फोटो गुडघ्यावर बसून क्लिक केला होता. हरलीनचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी तिने 13 व्या वर्षी आपलं घर आणि कुटुंब सोडलं. क्रिकेटमध्ये नाव कमावण्यासाठी ती चंडीगडवरून हिमाचल प्रदेशमध्ये आली. 13 व्या वर्षी आपल्या आई-वडिलांना सोडून एका नव्या शहरात जाणं हरलीनसाठी सोपं नव्हतं. पण तिने प्रत्येक आव्हान स्वीकारलं आणि हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अंडर-19 अकॅडमीममध्ये तिने नाव नोंदवलं. भारतीय क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदा निवड झाल्यानंतर हरलीन म्हणाली होती, माझी आजी गुरुदेव कौर हिला मी भारतीय टीमकडून खेळावं असं वाटत होतं. हरलीनने तिच्या टीममधल्या निवडीचं श्रेय आई चरणजीत देओललाही दिलं, कारण हरलीनच्या प्रत्येक निर्णयात आईने साथ दिली होती.
    Published by:Shreyas
    First published: