मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Suno Kohli म्हणत नेटकऱ्यांनी Virat Kohli ला का केले ट्रोल?

Suno Kohli म्हणत नेटकऱ्यांनी Virat Kohli ला का केले ट्रोल?

Suno Kohli म्हणत नेटकऱ्यांनी Virat Kohli ला का केले ट्रोल?

Suno Kohli म्हणत नेटकऱ्यांनी Virat Kohli ला का केले ट्रोल?

टी -20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup)लोकांनी ट्विटरवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : सर्वत्र दिवाळीची(Diwali festival) लगबग सुरु झाली आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला(Virat Kohli) दिवाळी या सणावरुन Suno Kohli म्हणत नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्यामुळे विराटने नेमकं काय केले आहे असा प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

विराट कोहलीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने, हे वर्ष भारतात आणि जगभरातील लोकांसाठी खूप कठीण गेले आहे.

प्रत्येकजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो. जसा हा सण जवळ येत आहे. मी तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना एक अर्थपूर्ण दिवाळी कशी साजरी करायची आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा याच्या टिप्स देईन. असे म्हटले आहे.

पण विराटचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला नाही. नेटकऱ्यांनी Suno Kohli म्हणत त्याला ट्रोल केले आहे. मजेशीर मीम्स शेअर करत त्याला ट्रोल करत आहेत.

गेल्या वर्षीही दिवाळीत कोहलीला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि आपल्या संदेशात फटाके न फोडण्याचे आवाहनही केले होते. त्यावरुन त्याला ट्रोल करण्यात आले होते.

First published:
top videos

    Tags: Diwali 2021, Social media troll, Virat kohli