Home /News /sport /

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

World Test Championship आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे.

    मुंबई, 7 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेल्या हनुमा विहारीचं (Hanuma Vihari) टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे विहारीला इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं. तर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला या दौऱ्यासाठी संधी मिळालेली नाही. आयपीएलदरम्यान (IPL 2021) दुखापत झालेला केएल राहुल (KL Rahul) आणि कोरोनाची लागण झालेला ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांना इंग्लंडला जाण्याआधी फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याची मात्र या दौऱ्यासाठी निवड झालेली नाही, तसंच आयपीएलमध्ये संघर्ष करणारा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यालाही संधी देण्यात आलेली नाही. 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध (India vs England) त्यांच्या घरच्या मैदानात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांनाही टीममधून डच्चू देण्यात आला आहे. भारतीय टीम विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंगर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव स्टॅण्डबाय खेळाडू अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अरझान नागवासवाला
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, New zealand, Team india

    पुढील बातम्या