Home /News /sport /

Deepak Chahar Marriage : दीपक चहर 1 जूनला करणार लग्न, पत्रिका आली समोर

Deepak Chahar Marriage : दीपक चहर 1 जूनला करणार लग्न, पत्रिका आली समोर

Photo-BCCI

Photo-BCCI

आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022) 29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यानंतर 9 जून पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे, या सीरिजआधी टीम इंडियाचा क्रिकेटपटू लग्न करणार आहे.

    मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 ची फायनल (IPL 2022)  29 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. यानंतर 9 जून पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa)  यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे, या सीरिजआधी टीम इंडियाचा क्रिकेटपटू लग्न करणार आहे. भारताचा फास्ट बॉलर दीपक चहर (Deepak Chahar Marriage) 1 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत (Jaya Bharadwaj) लग्न करणार आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात युएईमध्ये दीपक चहरने स्टॅण्डमध्ये जाऊन जया भारद्वाजला प्रपोज केलं होतं. दीपक आणि जया यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल 2022 आधी दीपक चहरला दुखापत झाली, त्यामुळे तो आयपीएलही खेळू शकला नाही, तसंच दक्षिण आफ्रिका सीरिजसाठीही तो मैदानात उतरणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी चहर फिट होण्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने चहरला 14 कोटी रूपयांना विकत घेतलं, पण दुखापतीमुळे तो मैदानात उतरू शकला नाही, याचा फटका सीएसकेला मोठ्या प्रमाणावर बसला. चार वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नईला यंदा प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळाला नाही. मागच्या वर्षी सीएसकेला आयपीएल चॅम्पियन करण्यात दीपक चहरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
    कोण आहे जया भारद्वाज? दिल्लीतल्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये जया काम करते. प्रसिद्धीपासून फार लांब असल्यामुळे जयाबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. सोशल मीडियावरही ती फारशी ऍक्टिव्ह नसते. एमटीव्ही स्पिल्ट्स व्हिला सिझन 2 चा विजेता असलेल्या सिद्धार्थ भारद्वाजची ती लहान बहिण आहे. सिद्धार्थ भारद्वाज फक्त VJ नाही तर मॉडेलही आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या