टीम इंडियाला 18 चा खतरा! 6 वर्षांमध्ये जमलं नाही, यंदा करुन दाखवणार?

टीम इंडियाला 18 चा खतरा! 6 वर्षांमध्ये जमलं नाही, यंदा करुन दाखवणार?

सलग तीन वर्ष 18 तारखेला झालेल्या मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा 18 जून रोजी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न्युझिलंड विरोधात खेळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : कोरोनामुळे आयपीएल (IPL Cancelled) स्थगित झाल्यानंतर आता भारताचे क्रिकेटपटू आपापल्या घरी पोहोचले आहेत. क्रिकेटच्या चाहत्यांना लवकरच टीम इंडिया पुन्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच भारताचा संघ इंग्लंड (England) दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. हा दौरा साधारणपणे तीन महिन्यांहून अधिक काळ असणार आहे.

इंग्लंडमध्ये आधी भारताचा संघ इंग्लंडच्या विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडसोबत पाच कसोटी (Test series) सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे, कसोटी विश्व चषकाचा अंतिम सामना हा 18 जून पासून साऊथैम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. स्पोर्ट्स विकीने याबाबतचं वृत्त दिलंय.

भारतासाठी 18 जून तारीख अनलकी?

गेल्या पाच-सहा वर्षांचा इतिहास पाहता, भारतासाठी 18 जून ही तारीख अगदीच अनलकी ठरली आहे.

भारताने 2015 मध्ये बांगलादेश विरोधात 18 जूनला एकदिवसीय (one day) सामना खेळला होता. या सामन्यात भारताचा बांगलादेशने पराभव केला होता. पहिला सामना हारल्यानंतर भारताला दुसऱ्याही सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. हा भारताचा (India) बांगलादेश (Bangladesh) विरोधातील वनडे सीरीजमधला पहिला पराभव होता.

(वाचा - विराट कोहलीनं घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, सर्वांना केलं खास आवाहन)

या दिवशी अगदी किरकोळ संघांकडून भारताचा पराभव -

2016 मध्ये 18 जूनला भारताने झिंबॉम्ब्वे सोबत सामना खेळला होता. धोनीच्या नेतृत्वातील तेव्हाच्या बलाढ्य भारतीय संघासमोर झिंबाब्वेचा संघ अगदीच किरकोळ वाटत होता. मात्र अगदी सोप्प्या वाटणाऱ्या या सामन्यामध्येही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. अवघ्या दोन धावांनी भारताने हा सामना गमावला होता. अर्थात, नंतर या मालिकेत भारताने चांगली कामगिरी करुन दाखवली होती.

यानंतर 2017 मध्ये 18 जूनला भारताचा पाकिस्तानसोबत (Pakistan) सामना होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताची वाटचाल अशी होती, की सर्वांना भारताचाच विजय होईल अशी खात्री होती. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यातही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.

अशाप्रकारे सलग तीन वर्ष 18 तारखेला झालेल्या मॅचमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा 18 जून रोजी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप न्युझिलंड विरोधात खेळणार आहे. यावर्षी 18 तारखेची ही अनलकी सीरीज भारत तोडणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: May 10, 2021, 9:57 PM IST
Tags: team india

ताज्या बातम्या