Teacher's Day Special : गुरु-शिष्याची हिट जोडी! 'या' शिक्षकांमुळे देशाला मिळाले सचिन, धोनी आणि विराट

आपल्या आयुष्यात शिक्षकाला महत्त्वाचे स्थान आहे. अशाच काही गुरुंनी भारतीय संघाला दिग्गज खेळाडू दिले.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 07:30 PM IST

Teacher's Day Special : गुरु-शिष्याची हिट जोडी! 'या' शिक्षकांमुळे देशाला मिळाले सचिन, धोनी आणि विराट

मुंबई, 05 सप्टेंबर: (Teachers day) आपल्या आयुष्यात शिक्षकाला महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षकांचा सन्मान आदर आणि गौरव करणारा दिवस म्हणून 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले उप-राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा करण्यात येतो. शिक्षकांमुळेच आपण कोणत्याही क्षेत्रात यश संपादीत करू शकतो. त्यामुळं शिक्षकाला अनन्य साधारण महत्त्व असेत. अशाच काही गुरूंनी भारतीय संघाला दिग्गज खेळाडू दिले. आज आपण अशाच गुरू-शिष्याच्या जोडीबाबत जाणून घेऊया

सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर

क्रिकेटचा देव या नावानं आजही लोकांच्या मनात घर केलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला शिक्षकामुळेच या क्षेत्रात अव्वल स्थान मिळाले. सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आचरेकर यांनी सचिनची प्रतिभा ओळखली आणि त्याला फलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सचिनला बॅट कशी पकडायची हे त्यांनीच शिकवले. आजच्या दिवशी सचिननं आचरेकरांची आठवण काढत, आचरकर सरांनी मला क्रिकेट आणि खेळात स्ट्रेट कसे राहायचे हे शिकवले असे सांगितले.

वाचा-प्रिती झिंटाच्या संघानं डच्चू दिल्यानंतर 'या' संघाकडून खेळणार अश्विन!

महेंद्रसिंग धोनी-केशव बनर्जी

Loading...

कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीला फुटबॉल सोडून जगातला सर्वोत्तम फलंदाज बनवण्यासाठी त्याचे गुरु केशव बनर्जी यांचे मोठे योगदान आहे. धोनीचे फुटबॉल प्रेम सर्वांना माहित आहे, मात्र केशव यांनी धोनीला क्रिकेटची गोडी लावत क्रिकेटकडे त्याचे लक्ष्य वळवले. याच धोनीनं 2011मध्ये भारताला विश्वकप जिंकून दिला.

युवराज सिंग-योगराज सिंग

युवराज सिंग टीम इंडियात सामिल झाल्यापासून त्याला सिक्सर किंग या नावानं ओळखले जायचे. यामागे सर्वात मोठे योगदान त्याचे बाबा योगराज सिंग यांचे होते. योगराज यांनी युवीला कठिण ट्रेनिंग दिले, यामुळं युवराज आपल्या गुरुंना ड्रॅगन म्हणायचा. मत्र क्रिकेट या क्षेत्रात वळण्याचे श्रेयही युवी योगराज यांना देतो.

वाचा-'या' कारणामुळे अजूनही विराटपेक्षा धोनीच वरचढ, दिग्गज क्रिकेटपटूनं व्यक्त केलं मत

विराट कोहली- राजकुमार शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्या बालपणात त्याला राजकुमार शर्मा यांनी योग्य मार्गदर्शन दिले. कोहलीच्या सुरुवातीच्या काळात त्याला राजकुमार वर्मा यांनी क्रिकेटचे धडे दिले. कोहलीनं आपल्या शिक्षकांचा सन्मान करतो, तसेच, 2014मध्ये शिक्षकदिनीच त्यानं राजकुमार यांना स्कोडा रॅपिड गाडी भेट दिली होती.

अजिंक्य रहाणे- प्रवीण आमरे

रहाणेला क्रिकेटच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवण्यासाठी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी मदत केली. आजही आमरे रहाणेला मार्गदर्शन देत असतात.

वाचा-अखेरच्या मॅचमध्ये टीम इंडियाला जिंकवलं अन् सचिनसोबतच संपलं ‘या’ गोलंदाजाचं करिअर

जम्बो दंड भरण्यातून वाहनधारकांना मोठा दिलासा, रावतेंनी केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...