मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /अखेर ठरलं! या अभिनेत्रीचं बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब

अखेर ठरलं! या अभिनेत्रीचं बुमराह-संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही, पण बॉलीवूड अभिनेत्री तारा शर्मा (Tara Sharma) हिने मात्र इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून हे दोघं लग्न करणार असल्याचं सांगितलं

पुढे वाचा ...

मुंबई, 13 जानेवारी : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टनंतर (India vs England) माघार घेतली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही बुमराहने लग्नासाठी सुट्टी घेतल्याचं सांगितलं. पण बुमराह नक्की कोणाशी लग्न करणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. सुरुवातीला बुमराहचं लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनसोबत (Anupama Parmeswaran) होईल असं बोललं गेलं. अनुपमा राजकोटला आल्यामुळे या चर्चांना हवा मिळाली, पण तिच्या आईने या चर्चा फेटाळून लावल्या. यानंतर स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) याच्यासोबत बुमराहचं नाव जोडलं गेलं. 14 आणि 15 मार्चला गोव्यात या दोघांचं लग्न होईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही, पण बॉलीवूड अभिनेत्री तारा शर्मा (Tara Sharma) हिने मात्र इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून हे दोघं लग्न करणार असल्याचं सांगितलं, त्यामुळे तारा शर्माने बुमराह आणि संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं.

'जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना त्यांच्या होणाऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तारा शर्मा शोमध्ये आल्याबद्दल जसप्रीत बुमराहचे धन्यवाद. सहाव्या मोसमात तुम्ही दोघं एकत्र या शोसाठी याल, अशी अपेक्षा,' अशी इन्स्टाग्राम पोस्ट तारा शर्माने लिहिली आहे. याच पोस्टसोबत तारा शर्माने बुमराह आणि तिच्या दोन मुलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Jasprit bumrah