'इमरान यांच्यामुळं पाकचे खेळाडू आले रस्त्यावर', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक आरोप

'इमरान यांच्यामुळं पाकचे खेळाडू आले रस्त्यावर', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक आरोप

पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या चाहत्यांच्या आणि पत्रकारांच्या संतापाचा शिकार झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या चाहत्यांच्या आणि पत्रकारांच्या संतापाचा शिकार झाली आहे. श्रीलंकेविरोधात झालेल्या टी-20 मालिकेत पाकचा 3-0नं लाजीरवाणा पराभव झाला. त्यानंतर पाकिस्तान संघावर टीका करण्यात येत आहे. यात आता माजी क्रिकेटपटूनं पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि पीसीबी यांच्यामुळं खेळाडू रस्त्यावर आले आहेत, असा धक्कादायक आरोप केला आहे.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज तन्वीर अहमदनं इमरान खान आणि पीसीबीवर गंभीर आरोप केले आहे. तन्वीरनं पाकिस्तानमध्ये क्रिकेट विभाग नसल्यामुळं खेळाडू बेरोजगार झाले आहेत. तन्वीरनं इमरान यांच्यावर आरोप लगावत, “मला पीसीबीवर प्रचंड राग येत आहे. सीमा असते कोणत्याही गोष्टीची. तुम्ही क्रिकेट विभाग परस्पर बंद केलात, यामुळे क्रिकेटपटू बेरोजगार झाले आहेत. हे सगळे पंतप्रधान इमरान खान यांच्यामुळे झाले आहे”, असा राग व्यक्त केला आहे.

तन्वीरनं सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत इमरान खान यांच्यावर टीका केली आहे. यात त्यानं, “क्रिकेट विभाग बंद करण्यासाठी इमरान यांनी ऑस्ट्रेलिया सारख्या 6 टीम केल्या. वर्ल्ड क्लास खेळाडू मिळाले का? 70 वर्ष क्रिकेट विभाग सुरू होता, ती एका झटक्यात बंद केली. पीसीबीला कोणी समजवेल का?”, असा सवाल केला. तसेच, क्रिकेट विभाग बंद करून पंतप्रधानांनी पाकमधल्या क्रिकेटपटूंना रस्त्यावर आणले आहे, असाही राग व्यक्त केला.

वाचा-‘हा प्रश्न मोदी आणि इमरान यांना विचारा’, गांगुलीच्या वक्तव्यानं खळबळ

 

View this post on Instagram

 

Former cricketer Tanvir Ahmed bashes PM Imran Khan and PCB on the shutting down Department cricket. #TanvirAhmed #Cricket #Pakistan #ImranKhan #Karachi #Lahore #PCB #NationalT20Cup

A post shared by Khel Shel (@khelshel) on

वाचा-संघात जागा मिळाली नाही म्हणून 'हा' स्टार खेळाडू चालवतोय पिक-अप ट्रक, VIDEO VIRAL

ट्रक आणि टॅक्सी चालवत आहे खेळाडू

तन्वीर यांनी क्रिकेट विभाग बंद झाल्यामुळं खेळाडूंवर ट्रक आणि टॅक्सी चालवण्याची वेळी आली आहे. एकेकाळी पाकिस्तानच्या स्थानिक क्रिकेटमध्ये त्यानं आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र आता अशी परिस्थिती आली आहे, की त्याल पिक-अप ट्रक चालवावा लागत आहे. ही गोष्ट आहे, पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या फझल शुभान. फजल शुभान हा 31 वर्षांचा असून अंडर-19 क्रिकेटमध्ये त्यानं आपला दहशत निर्माण केली होती. त्याच्या याच खेळीच्य जोरावर त्याला पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघातही स्थान मिळणार होते. मात्र त्याची संधी हुकली, आणि आता हाच फजल पाकिस्तानमध्ये पिक-अप ट्रक चालवत आहे.

वाचा-VIDEO : अरेरे! पराभवानंतर भडकला पाकचा चाहता, कर्णधाराला लाथा-बुक्क्यांनी धुतलं

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: imran khan
First Published: Oct 18, 2019 09:23 AM IST

ताज्या बातम्या