India vs South Africa : क्रिकेटच्या मैदानात धोनीला मिस करताय? पाहा स्टम्पिंगचा हा तुफानी VIDEO

India vs South Africa : क्रिकेटच्या मैदानात धोनीला मिस करताय? पाहा स्टम्पिंगचा हा तुफानी VIDEO

एकीकडे विराटसेना दक्षिण आफ्रिका संघाचा समाचार घेत असताना भारताच्या महिला संघानंही आपला दबदबा कायम ठेवला आहे.

  • Share this:

वडोदरा, 10 ऑक्टोबर : एकीकडे विराटसेना दक्षिण आफ्रिका संघाचा समाचार घेत असताना भारताच्या महिला संघानंही आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघात सध्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामना भारतानं आठ विकेटनं जिंकला. पहिल्या सामन्यात भारताच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते युवा विकेटकीपर तानिया भाटीयानं (Taniya Bhatia).

पहिल्या एकदिवसीय सामन्यात तानियानं स्टम्प आऊट करत सर्वांचे लक्ष वेधले. तानियानं दिग्गज विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजात फलंदाजाला बाद केले. तानियानं आफ्रिकेची फलंदाजी तृषा चेट्टीला (Trisha Chetty) स्टम्प आऊट केले. तिचा हा अंदाज पाहून चाहत्यांनी तिची तुलना धोनीशी केली आहे. धोनी गेले तीन महिने क्रिकेटपासून लांब आहे. वर्ल्ड कपनंतर धोनीनं एकही सामना खेळलेला नाही.

वाचा-...तरच आशियाई कपमध्ये होणार भारत-पाक सामना, BCCIने घातली अट

वाचा-बेन स्टोक्सनं दाबला पत्नीचा गळा? ट्विटरवर आलं सत्य समोर

दरम्यान, या सामन्यात तृषानं एकता बिष्टच्या गोलंदाजीवर स्लॉग स्विप मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली. यावेळी तानियानं एकही एका सेकंदात तृषाला तंबूत पाठवले. या सामन्यात तृषा फक्त 14 धावा करू शकली. दरम्यान आफ्रिकेनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 45.1 ओव्हरमध्ये 164 धावांवर आफ्रिकेचा डाव आटपला. आफ्रिकेनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 50 चेंडूंआधीच 8 विकेटनं विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेकडून मारिझा कापनं सर्वाधिक 54 धावा केल्या, तर भारताकडून प्रिया पूनियानं पदार्पणातच 75 धावांची शानदार खेळी केली. तर, जेमिमा रोड्रिग्जनं 55 धावांची खेळी करत भारताला सहज विजय मिळवून दिला.

वाचा-झिवानं रणवीर सिंहवर केला चोरीचा आरोप, धोनीनं दिलं स्पष्टीकरण

वाचा-‘रोहितबाबत मला काही विचारू नका’, पत्रकार परिषेदत एका प्रश्नावरून भडकला विराट

VIDEO :...म्हणून रिलायन्स जिओ फोन कॉल्ससाठी शुल्क आकारणार!

First Published: Oct 10, 2019 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading