Home /News /sport /

'6 महिने टी-20 मधून ब्रेक घेतोय', T20 World Cup खेळणार नाही दिग्गज खेळाडू!

'6 महिने टी-20 मधून ब्रेक घेतोय', T20 World Cup खेळणार नाही दिग्गज खेळाडू!

ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी आयसीसीने या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. वर्ल्ड कपला एवढे महिने शिल्लक असतानाही बांगलादेशचा (Bangladesh Cricket) अनुभवी ओपनर तमीम इक्बाल (Tamim Iqbal) खेळणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 जानेवारी : ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी आयसीसीने या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली. वर्ल्ड कपला एवढे महिने शिल्लक असतानाही बांगलादेशचा (Bangladesh Cricket) अनुभवी ओपनर तमीम इक्बाल (Tamim Iqbal) खेळणार का नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पुढचे 6 महिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून ब्रेक घेत असल्याचं तमीम इक्बालने सांगितलं आहे. तमीमने मागच्या टी-20 वर्ल्ड कपमधूनही माघार घेतली होती. या फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या माझ्या सहकऱ्यांवर अन्याय होईल, असं कारण तमीमने दिलं होतं. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जर वर्ल्ड कपआधी आपल्याला विचारलं तर मी या निर्णयाचा पुनर्विचार करेन, असं तमीमने सांगितलं आहे. तमीम मागच्या बऱ्याच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट खेळत नाहीये. वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये लक्ष देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं तमीमने सांगितलं. 'माझ्या टी-20 क्रिकेटच्या भविष्याबाबत चर्चा सुरू आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मला वर्ल्ड कपपर्यंत खेळण्याचा आग्रह केला जातोय. माझा विचार मात्र वेगळा आहे. मी पुढच्या 6 महिन्यांसाठी टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये खेळण्याचा विचार करणार नाही,' अशी प्रतिक्रिया तमीम इक्बालने दिली. 'माझं पूर्ण लक्ष टेस्ट आणि वनडेवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि 2023 वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होण्याची तयारी मी करत आहे. पुढचे 6 महिने मी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल विचार करणार नाही. खेळाडू टी-20 मध्ये एवढी चांगली कामगिरी करतील, ज्यामुळे माझी गरजच पडणार नाही, अशी आशा मला आहे,' असं वक्तव्य तमीमने केलं. तमीम इक्बालने अखेरची टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच झिम्बाब्वेविरुद्ध 2020 साली खेळली होती. यानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. आतापर्यंत 78 टी-20 मॅचमध्ये त्याने 24.08 च्या सरासरीने 1758 रन केले, यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup

    पुढील बातम्या