Tamil Nadu Premier League : धोनीनं एकदाही दिली नाही संधी, आता हाच फलंदाज पाडतोय धावांचा पाऊस!

Tamil Nadu Premier League : धोनीनं एकदाही दिली नाही संधी, आता हाच फलंदाज पाडतोय धावांचा पाऊस!

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणाऱ्या या फलंदाजाला धोनीनं एकदाही संधी दिली नव्हती.

  • Share this:

चेपॉक, 30 जुलै : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळं युवा खेळाडूही धोनीच्या नेतृत्वाकडे आकर्षित होतात. भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमध्येही धोनी नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देतो. मात्र, चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक हिरा पारखण्यात धोनी चुकला. त्यामुळेच भारताच्या स्थानिक क्रिकेटमधला विकेटकीपर फलंदाज एन. जगदीशनला आयपीएलमध्या एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र हा फलंदाज सध्या तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

एन. जगदीशन सध्या तामिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर थेट कर्णधार धोनीशी तुलना होत आहे. मात्र जगदीशनला आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. जर त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली असती तर, आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये त्याला संधीही मिळू शकली असते. कारण जगदीशन सध्या सुरू असलेल्या टीएमलएल लीगमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे.

आतापर्यंत टीएनएलमध्ये जगदीशननं तीन अर्धशतक लगावले आहेत. टीएनएलमध्ये जगदीशन डिंडीगुल ड्रेगन्‍सकडून खेळतो, त्यानं आतापर्यंत 4 सामन्यात 235 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जगदीशन पहिल्या क्रमांकावर आहे. तर, दुसऱ्या स्थानावर आहे एच. गोपीनाथ. त्यानं 4 सामन्यात 178 धावा केल्या आहेत.

वाचा-सानियानंतर आणखी एक भारतीय पाकची सून, 'या' क्रिकेटपटूसोबत अडकणार विवाहबंधनात

जगदीशनचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त

जगदीशननं चार सामन्यात117.50च्या सरासरीनं 235 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा 146.87 आहे. यात त्यानं 23 चौकार लगावत 7 षटकारही लगावले आहेत.

वाचा- आता रोहित-विराटची मैदानावर होणार टक्कर, कोण होणार टी-20चा बादशाह!

तामिळनाडु प्रीमिअर लीग : तामिळनाडु प्रीमिअर क्रिकेट लीग एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. यात अंकतालिकेत सध्या डिंडीगुल ड्रेगन्‍स पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाचा कर्णधार भारताचा फिरकीपटू आर. अश्विन आहे.

वाचा- 'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

VIDEO: रस्ते, गावं पाण्याखाली; पुरामुळे हाहाकार

Published by: Akshay Shitole
First published: July 30, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading